Navi Mumbai Police News : मावळच्या मतदानासाठी नवी मुंबई पोलिसचा कडक बंदोबस्त आणि नागरिकांना आव्हान

पनवेल :- लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election News अनुषंगाने येत्या तेरा तारखेला मावळ मतदार संघाचे मतदाना होणार आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई पोलिस आयुक्तलयामध्ये लोकसभेचे मतदान होणार आहे.. मावळ लोकसभा मतदारसंघात Mawal Lok Sabha उरण आणि पनवेल असे दोन विधानसभा मतदार संघ येतात. या दोन्ही ठिकाणी 281 मतदान केंद्रे आणि 796 बूथ नवी मुंबई मध्ये असणार आहे.. त्याअनुषंगाने नवी मुंबई पोलीस सज्ज झाले असून त्यासाठी एक डीसीपी, सहा एसीपी, 25 पिआय, 114 एपीआय, 1450 पोलीस, 735 होमगार्डस, 3 कंपनी सिएपीएफ – एसएपीएफ असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.. 43 सेक्टरपेट्रेलियम वाहने असणार आहेत.. स्ट्रायकिंग ची दहा पथके तसेच शंभर मीटरच्या आतमध्ये इलेक्ट्रिकल वस्तू. मोबाईल, लाऊडस्पीकर, तसेच एकमेकांना ओळख दाखवणे, पक्षाचे चिन्ह दाखवणे, हस्तांदोलन करणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी 200 मीटरच्या बाहेर वाहने लावावीत, आणि आजारी व्यक्तींसाठी 100 मीटर च्या आतमध्ये वाहने आणण्यासाठी परवानगी दिलेली आहे. निर्भीड आणि उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आव्हान उपायुक्त विवेक पानसरे Vivek Pansare यांनी मतदारांना केले आहे. Navi Mumbai Police News