क्राईम न्यूजमुंबई

Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांच्या व्हाट्सअप चॅनेल आणि हेल्प लाईन क्रमांकाचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते अनावरण

Navi Mumbai police launches WhatsApp Channel to raise public awareness on safety and crime prevention: चॅनेलवरुन , सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, महिला सुरक्षितता, अंमली पदार्थ प्रतिबंधक जनजागृतीचे मेसेज आणि व्हिडिओ नवी मुंबईकरांना मोबाईलवर पाहता येणार

नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तर्फे आयोजित केलेल्या ‘सायबर योध्दा’ प्रकल्पाचे उद्घाटन व्हाट्सअप चॅनेल आणि हेल्प लाईन क्रमांकाचे अनावरण पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले होते. सिडकोच्या ऑडिटोरियम, वाशी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात महासंचालक यांनी सांगितले की,तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वाढत्या तंत्रज्ञाना बरोबर सायबर गुन्हयांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. इंटरनेटद्वारे होणाऱ्या विविध सायबर व सोशल मिडीयाव्दारे होणा-या अन्य गुन्हयांपासुन नागरिकांचे संरक्षण करणे व सायबर गुन्हयांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. Navi Mumbai Police Latest News

रश्मि शुक्ला यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या नवी मुंबई पोलीसांच्या “WhatsApp channel” द्वारा नवी मुंबई मधील नागरिकांना प्रथम संदेश पाठविण्यात आला. चॅनेल वरून नियमीत सायबर, आर्थिक, महिला सुरक्षा विषयक तसेच अंमली पदार्थ संबंधी गुन्हयांबाबत जनजागृती विषयक संदेश तसेच व्हिडीओ प्रसारित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. Straightforward and Benefit-Driven: “Stay Safe and Alert with Navimumbai Police’s WhatsApp Channel” नवी मुंबई सायबर हेल्प लाईन क्रमांक 8828-112-112 हा नागरिकांकरिता २४ x ७ उपलब्ध करून देण्यात आला आहे. हेल्प लाईनद्वारे सायबर फसवणुक Cyber Fraud तसेच सोशल मिडीया संदर्भातील तक्रारीबाबत नागरिकांना मदत तसेच जनजागृती करण्यात येणार आहे. Navi Mumbai Police Latest News

कार्यक्रमा दरम्यान तज्ञ व्याख्यात्याकडुन विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.ॲड. डॉ. प्रशांत माळी – सायबर गुन्हयांबाबत जागरुकता व सायबर गुन्हयांपासुन दक्षता.डॉ. शितल बिडकर अंमली पदार्थ संबंधी गुन्हयांबाबत जनजागृती.ॲड. ऑड्रे डिमेलो महिला सुरक्षा संबंधीत गुन्हयापासुन घ्यावयाच्या खबरदारी,अविनाश मोकाशी अर्थिक गुन्हयाबाबत जनजागृती, सुरेश मेनन (सायबर योध्दा) सायबर गुन्हयांपासुन दक्षता व जनजागृती साठी लोक सहभाग होते.कार्यक्रमाकरीता नवी मुंबई पोलीस आयुक्तलयातील नगरसेवक, वकील, डॉक्टर, बॅक अधिकारी, जेष्ठ नागरीक, समाजसेवक, विविध कंपन्याचे प्रतिनीधी तसेच शाळा/कॉलेज मधील विदयार्थी असे सुमारे 1500 नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. Navi Mumbai Police Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0