क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Navi Mumbai News : सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे! – नवी मुंबई गुन्हे शाखेची धडक कारवाई; उरण फाटा आणि कळंबोली येथील 10 तृतीयपंथीयांना अटक

Navi Mumbai Police Take Action On Transgender : पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची मोहीम; बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि विभत्स हावभाव करत नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) कठोर कारवाई केली आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून एकूण 10 तृतीयपंथीयांना ताब्यात घेण्यात आले आहे. Navi Mumbai Police Latest Crime News

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने (दिनांक 2 डिसेंबर ) रोजी दोन पथके तयार करून मोहीम राबवली. उरण फाटा सर्व्हिस रोड आणि कळंबोली स्टील मार्केट रोड या दोन महत्त्वाच्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. Navi Mumbai Crime News

या ठिकाणी काही तृतीयपंथी तोकडे कपडे परिधान करून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना टाळ्या वाजवून, हातवारे आणि विभत्स हावभाव करत अश्लील चाळे करत होते. या गैरप्रकारांमुळे नागरिकांना मोठा त्रास होत होता.

पोलिसांनी उरण फाटा सर्व्हिस रोड येथून पाच तृतीयपंथीयांना आणि कळंबोली स्टील मार्केट रोड येथून पाच तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले. या सर्व 10 तृतीयपंथीयांविरुद्ध सीबीडी आणि कळंबोली पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296 आणि 3(5) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0