महाराष्ट्र
Trending

Chief Justice Of India : Suryakant : न्यायमूर्ती सूर्यकांत होणार देशाचे 53 वे सरन्यायाधीश!

Chief Justice Of India : विद्यमान सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी केंद्र सरकारकडे केली शिफारस; 24 नोव्हेंबरला शपथ घेण्याची शक्यता

ANI :- सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश (CJI) भूषण आर. गवई यांनी सोमवारी (27 ऑक्टोबर ) केंद्र सरकारकडे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे. या शिफारसीसह, सर्वोच्च न्यायालयाच्या 53 व्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली आहे.

नियुक्तीची प्रक्रिया

सरन्यायाधीश गवई यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे नाव मंजुरीसाठी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे पाठवले आहे.पारंपारिकपणे, कायदा मंत्रालयाने विनंती केल्यानंतरच विद्यमान सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकारीची शिफारस करतात.

कार्यकाळ आणि निवृत्ती

विद्यमान सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 रोजी संपत आहे.

त्यांच्या जागी न्यायमूर्ती सूर्यकांत हे 24 नोव्हेंबर 2025 रोजी देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.

न्यायमूर्ती सूर्यकांत हे 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील. त्यांचा कार्यकाळ अंदाजे 14 महिन्यांचा असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0