34 वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा
नवी मुंबई महाराष्ट्र मिरर : नवी मुंबई परिसरात अनेक ठिकाणे बॉम्बने उडवणार Navi Mumbai Bomb Threat असल्याचा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता.यंत्रणा तत्काळ ॲक्शन मोडवर आली. फोनचे लोकेशन गाठत पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला अखेर 34 वर्षीय तरुणाने मद्यधुंद अवस्थेत फोन केल्याचे सांगितले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
याप्रकरणी ख्रिस्ताफर अँथोनी डायक (34 वय) या व्यक्तीवर कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला चौकशीसाठी पोलिसांनी नोटिसही बजावली आहे.
1 डिसेंबरला पहाटे सुमारास नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होणार आहे असा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला होता. या फोननंतर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी संपूर्ण यंत्रणेसह कामाला लागले. फोन करणा-या इसमाचा शोध घेत असताना ख्रिस्तोफर अँथोनी डायस याने फोन केल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने मद्यधुंद अवस्थेत करुन पोलिस नियंत्रण कक्षाला बाँम्ब संदर्भात खोटी माहिती दिली असल्याचे समोर आले.या ख्रिस्तोपर विरोधात कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद झाली असून त्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटिसही पोलिसांनी बजावली आहे.