मुंबई

Navi Mumbai News : नवी मुंबई मधील आकर्षण ब्रह्मा विष्णू महेश गणेशोत्सव मंडळ

नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर भाग विद्यमान मुंबई नंतर उत्तम विकसित परिसर आहे.बीव्हीएम ग्रुपच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यात आला.

ब्रह्मा विष्णू महेश गृहनिर्माण संस्था आहे. व्यावसायिक, स्थानिक रहिवासी यांनी मिळून मंडळाची स्थापना उत्साहात केली. पाच वर्षात या गणरायावर गणेश भक्तांची श्रद्धा वाढत गेली. यंदा पाचव्या वर्षी हजारो लोकांनी श्री दर्शन घेतले.महालक्ष्मी पूजनाचा कर्नाटक शैलीमध्ये होणारा पुजनोत्सव हे इथले विशेष आकर्षण असते.
या मंडळाचे आणखी महत्वाचे म्हणजे स्वतःचा बडेजाव न दाखवता गणेश भक्ती. कुणीही स्वतःचे मोठ मोठे बॅनर, स्वतःची पद दाखवणारे बॅनर लावत नाही. प्रभात, मनोहर, गिरीश, महेश, सुरज, ओंकार, रवी, आदर्श, शर्माजी अशा सर्वसमावेशक नावाने स्वतःला वैयक्तिक महत्व न देता गणरायांची सेवा करणारे बीव्हीएम अर्थात ब्रह्मा विष्णू महेश गणेश मंडळ त्यामुळे महत्वाचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0