Panvel Crime News : पनवेल पोलीसांची कारवाई ; महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड
•Action Of Panvel Police On Highway Robbery Gang रात्रीच्या अंधारात राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दबा धरून मालवाहू वाहनांना ट्रक-कंटेनर चालकांना शस्त्रांचा धाक दाखवून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा पनवेल तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
पनवेल :- रात्रीच्या अंधारात मुंबई-पुणे राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दबा धरून मालवाहू वाहनांना रोखत ट्रक-कंटेनर चालकांना शस्त्राचा धाक दाखवून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा पनवेल तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील पाच संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
9 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान पनवेल तालुक्यातील लघुशंकेला (लघवी) करिता उतरले असता एका ट्रकचालकाला दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक देत रोकड तसेच मोबाईल लुटले होते. त्याबाबत गेंदलाल रामगरीब पटेल (34 वर्ष,रा. मध्यप्रदेश) पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बी एन एस कलम 309(4),309(6) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
नवी मुंबई आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिसांच्या तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंमलदार यांचे एक पथक तयार केले. घटना घडल्यापासून पोलिसांनी आणि प्रत्यक्षदर्शी आणि गोपनीय माहितीद्वारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. पोलिसांना तांत्रिक आणि गोपनीय माहितीद्वारे आठ जणांच्या टोळीने हे कृत्य केल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले होते. याप्रकरणी आठपैकी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित तीन आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या पाचही आरोपींना पोलिसांनी न्यायालय समोर हजर केले असता त्यांना 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली आहे.
दरोडेखोरांची नावे
1.रोहन उर्फ गुड्डु गोपीनाथ नाईक, (24 वर्षे)
2.रोहिदास सुरेश पवार,(23 वर्ष)
3.आतेश रोहिदास वाघमारे, (26 वर्षे)
4.मनिष काळुराम वाघमारे, (35 वर्ष)
5.शंकर चंदर वाघमारे, (18 वर्षे 5 महिने)
पोलीस पथक
पोलीस पथक (गुन्हे) शेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुरुद्ध गिजे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपुत, पोलीस हवालदार विजय देवरे, सुनिल कुदळे, महेश धुमाळ, शिवाजी बाबर,सतिश तांडेल, पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे,आकाश भगत,भिगराव खताळ, वैभव शिंदे.प्रविणा पाटील उत्कृष्ट कामगिरी करत आरोपींना अटक केली आहे.