क्राईम न्यूजमुंबई

Navi Mumbai Hookha Parlour : नवी मुबंई व पनवेल हद्दीत हुक्का पार्लर कारवाईचा दिखावा !

Navi Mumbai Nerul Police News : अवैद्य हुक्का पार्लरवर नेरुळ पोलिसांनी कारवाई

नवी मुंबई ( Maharashtra Mirror ) : नवी मुबंई व पनवेल हद्दीत हुक्का पार्लवर कारवाईचा (Hookah Parlour) दिखावा पोलीस प्रशासनातर्फे (Navi Mumbai Police Station) केला जात आहे. कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच हुक्का पार्लर पूर्वीसारखेच जोमाने सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. हुक्का पार्लर अनेक तरुणांचे संसार उघड्यावर पडत आहेत याचे काहीही सोयरसुतक पोलीस प्रशासनास नाही. पनवेल व नवी मुंबई परिसरातील हुक्का पार्लरवर कारवाई करून सर्व हुक्का पार्लर सील करण्याची मागणी नागरीकांतून केली जात आहे. (In Navi Mumbai People Demand to Government To seal Illegal Hookah Parlour And Dance Bar)

नवी मुंबई नेरूळ पोलीस (Navi Mumbai Nerul Police Station) स्टेशनच्या हद्दीतील हावरे सेंचुरियन मॉल मधील ब्लॉक फॉरेस्ट शॉप (Black Forest Hookah Parlour) येथून अवैद्य हुक्का पार्लर वर नेरुळ पोलिसांनी कारवाई केली आहे.
हुक्का पार्लर चालक/मालक सह वेटर असे तिघांना अटक करण्यात आली असून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४१ (१) (अ) अन्वये नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

ब्लॅक फॉरेस्ट, शॉप हावरे सेंच्युरियन मॉल, नेरूळ, नवी मुंबई या ठिकाणी चालक/मालक याने हुक्का पार्लर चालवणे हा त्याचेकडे काम करणारा वेटर याचे मदतीने वरील रेस्टॉरंटमध्ये त्यांचे ग्राहकांना हुक्क्यामध्ये निकोटीनयुक्त आणि तंबाखुयुक्त घटक असलेल्या सुगंधी पदार्थाचे सेवन करण्यासाठी देत असताना मिळुन आले म्हणुन त्याचे विरुध्द सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने (जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियम) (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम ४(A), २१ (A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तसेच १३,००/- रु. AL FAUZ कंपनीचा रॉयल स्मोकिंग व्हाईट रोज फ्लेवर असलेला चॉकलेटी रंगाचा प्लास्टीकचा चौकोणी डब्बा त्यावर इंग्रजीमध्ये स्मोकींग कॉजेस पेनफुल डेथ असा इशारा असलेला, त्यावर घटकामध्ये तंबाखु आणि निकोटीन असे लिहीलेला उघडुन पाहता त्यामध्ये चॉकलेटी रंगाचा चिकट पदार्थ अर्धा भरलेला जुवाफिसु व १५००/- किंमतीचेएकुण एक काचेचा बेस हुक्का पॉट आणि त्यास जोडलेली रबरी नळी जु.वा. किं.अं. असे एकूण २८,००/-रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Navi Mumbai Police Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0