Navi Mumbai Crime News : निलंबित तहसीलदार यांची संपत्ती दोन कोटीहून अधिक
•लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई यांच्याकडून कारवाई ; अपसंपदेचा गुन्हा दाखल
नवी मुंबई :- मिलन कृष्णा दळवी (49 वर्षे), निलंबित तहसीलदार, अलिबाग त्यांचे पती कृष्ण वसंत दळवी (55 वर्ष) खाजगी नोकरी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई यांनी त्यांच्या संपत्तीवर गुन्हा दाखल केला आहे.लोकसेविका मिनल कृष्णा दळवी, तहसिलदार, अलिबाग जि. रायगड यांचेविरुध्द 12 नोव्हेंबर 2022 रोजी अलिबाग पोलीस स्टेशन भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (संशोधन सन 2018) चे कलम 7, 7 (अ) अन्वये दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांचे मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. Navi Mumbai Crime News
मालमत्तेच्या उघड चौकशी दरम्यान लोकसेविका मिनल कृष्णा दळवी, तहसिलदार (सध्या निलंबित) यांनी त्यांचे सेवाकालावधी व परिक्षण कालावधी दरम्यान भ्रष्ट व गैरमार्गाने, कायदेशिर ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची अशी 2 कोटी 62 लाख 04 हजार 595 इतक्या रक्कमेची मालमत्ता संपादित केली असून त्याची टक्केवारी 98.97 टक्के असल्याचे निष्पन्न झाले आहे. Navi Mumbai Crime News
तसेच लोकसेविका मिनल कृष्णा दळवी व त्यांचे पती कृष्णा वसंत दळवी यांनी परिक्षण कालावधीमध्ये मिळालेल्या एकूण ज्ञात उत्पन्नापेक्षा एकत्रित रु. 2 कोटी 22 लाख 94 हजार 138 इतक्या रक्कमेची मालमत्ता संपादित केली असून त्याची टक्केवारी 84.20 टक्के इतकी आहे. कृष्णा वसंत दळवी यांनी प्रमाणे नमुद संपत्तीमधील मालमत्ता स्वतःच्या नावे बाळगून लोकसेविका मिनल कृष्णा दळवी यांना हेतुपुरस्सर व बेकायदेशिरपणे अपसंपदा मिळविणेसाठी प्रोत्साहन दिले म्हणून एपीएमसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Navi Mumbai Crime News