Navi Mumbai Crime News : नवी मुंबई गुन्हे शाखेकडून पिस्तूल, जिवंत राऊंड जप्त ; तीन व्यक्तींना ताब्यात
•बेकायदेशीर देशी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने दोन गावठी पिस्टल आणि एक जिवंत राऊंड असा 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
नवी मुंबई :- बेकायदेशीर देशी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने दोन देशी पिस्टल आणि एक जिवंत राऊंड असा एक लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी किशोर दत्ता धाडी (24 वय रा. नेरे, पनवेल) ऋषिकेश रघुनाथ लोटे (25 वय रा.वलप पनवेल) यशवंत बबन सत्रे (25 वय रा.वलप पनवेल) राहणार मसूर या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांकडून करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग पृथ्वीराज घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नैतिक मानवी विभागाचे पोलीस हवलदार अनिल मांडोळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तीन संशयित आरोपी हॉटेल न्यू रॉयल कॅफे आणि मटन शॉप चिखल सेंटर नेरे तील कॉर्नर वर काही व्यक्ती कार मोटर सायकल बंदुकीची विक्री करण्याकरिता रात्री सात ते नऊच्या दरम्यान येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील आणि त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात एक आरोपी ज्याचे नाव अर्जुन जाधव हा पाच जिवंत काडतुसे घेवून तेथून पळून गेला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यात वापरलेल्या कार आणि मोटरसायकल जप्त केले असून आरोपींविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय कायदा कलम 3 (25) सह बीएनएसक 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुण्याचा पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करत असून. आरोपींना 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला आहे.
पोलीस पथक
दिपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अजयकुमार लांडगे, धर्मपाल बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, पोलीस हवालदार मांडोळे, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, कोलते तसेच शिंदे यांनी केलेली आहे.