•चिलीहून आलेल्या 3630 टन अक्रोडांमागे सीमाशुल्क फसवणुकीचा मोठा डाव
नवी मुंबई | चविष्ट अक्रोडाच्या पाकिटामागे असा धक्कादायक घोटाळा लपलेला असेल, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) कारवाईमुळे ४२ कोटी रुपयांच्या करचोरीचा भयानक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील एक व्यापारी चक्क 3,630 मेट्रीक टन अक्रोड परदेशातून आयात करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावत होता.
नेरुळमधील ‘ड्राय फ्रूट डॉन’ अटकेत
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे आकाश अग्रवाल. तो नवी मुंबईच्या नेरूळ परिसरातील रहिवासी असून, एका ड्राय फ्रूट आयात करणाऱ्या कंपनीचा मालक आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत या ‘ड्राय फ्रूट डॉन’ने कर बुडवण्यासाठी चालवलेली क्लृप्ती समोर आली आहे.
अक्रोडांची कागदोपत्री किंमत कमी… हवालेने व्यवहार जादा!
चिली या देशातून आयात करण्यात आलेल्या अक्रोडांसाठी पुरवठादाराकडून घेतलेल्या बिलांपेक्षा 50 ते 70 टक्क्यांनी कमी किमती दाखवून सीमाशुल्क कमी भरण्यात आले. उर्वरित रक्कम चक्क ‘हवाला’ मार्गाने चिलीमध्ये पोहोचवण्यात येत असल्याचा डीआरआयला संशय आहे.
आयात मालाच्या कागदपत्रांमध्ये किंमत कमी दाखवायची, भारत सरकारकडून कमी कर आकारला जावा, आणि प्रत्यक्ष व्यवहार रोख स्वरूपात हवाला रॅकेटमार्फत चिलीला पाठवायचा – अशी बेमालूम गुंतवणूक साखळी तयार करण्यात आली होती. या संपूर्ण रचनेत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.
या संपूर्ण आर्थिक फसवणुकीचा तपास महसूल गुप्तवार्ता संचालनालयाचे अधिकारी करत आहेत. आंतरराष्ट्रीय हवाला नेटवर्क, बनावट आयात बिलं, आणि परकीय चलन व्यवहार यांचा सखोल तपास सुरू असून, आकाश अग्रवालच्या बँक खात्यांची व त्याच्या इतर व्यावसायिक भागीदारांची चौकशी केली जात आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…