Navi Mumbai Crime News : पैशाच्या पाऊस पाडतो असे सांगून मुलींचे शोषण करणारी टोळी गजाआड
•राबोडी पोलीसांनी भोंदू बाबासह सात जणांना अटक केली आहे
नवी मुंबई :- पैशाचा पाऊस पाडून महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका टोळीला राबोडी पोलीस ठाण्याने अटक केली पोलिसांनी भोंदू बाबासह सात जणांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.राबोडी पोलीस स्टेशन भादवी 363 गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शोध घटक -१ करीत असताना गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती मिळाली की, यातील पीडित मुलगी हिला पैशाचे पाऊस पाडणाऱ्या टोळीने तिची दिशाभूल करून स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. सदर माहितीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्यासाठी घटक च्या पथकाने यातील पीडित मुलीचा शोध घेतला व पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता, तिने घटकास मिळालेल्या माहितीप्रमाणे पैशाचे पाऊस पाडणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. Navi Mumbai Crime News
गुन्हात सहा आरोपींना अटक करण्यात आले आहे
1) असलम शमी उल्ला खान (54 वर्ष)
2) सलीम जखरुद्दीन शेख (45 वर्ष) राहणार राबोडी यांना दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी अटक करण्यात आली.
3) साहेबलाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा (मांत्रिक) ( 61 वर्ष )यांना 27 फेब्रुवारी 2024 रोजी अटक करण्यात आली असून कोर्टाने त्यांचा पोलीस कस्टडी एक मार्च 2024 पर्यंत मंजूर केलेली आहे. तसेच 29 फेब्रुवारी 2024 रोजी सदर गुन्ह्यात आरोपीत 4) तौसिफ शेख (30 वर्ष )
5) शबाना शेख (45 वर्ष)
6) शबिर शेख (53 वर्ष) राहणार राबोडी यांना अटक करण्यात आली. 7) हितेंद्र शेट्टे ( 56) वर्ष राहणार लालबाग मुंबई यांना दिनांक एक मार्च 2024 रोजी अटक करण्यात आली. Navi Mumbai Crime News
गुन्ह्यातील अटक आरोपी यांच्याकडे केलेल्या तपासात असे दिसून येते की, पैशाचे पाऊस पाडणारी टोळी गरजू मुली अथवा महिला यांना हेरून त्यांना पैशाचा पाऊस पडतो ह्यावर विश्वास बसावा यासाठी त्यांच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून ठेवण्यात आलेला व्हिडिओ पीडित मुलींना दाखविण्यात आला. ज्या व्हिडिओमध्ये एक महिला नग्न अवस्थेत झोपलेली असून तिच्या बाजूला पैशांचा ढिगारा पडलेला दिसत असलेला व्हिडिओ दाखवून पीडित मुलींचे मन आकर्षित करून करोड रुपये मिळतील याचे प्रलोभन दाखवून त्यांना विधी करण्यासाठी तयार केले, तसेच आरोपीनी पीडित मुलींना असेही सांगितले की, मांत्रिक विधीदरम्यान पूजा करणारा अथवा तेथे हजर असलेला इसमाच्या अंगात जीन येईल व त्याला त्या विधीला बसलेली नग्न महिले/ मुलीसोबत संभोग करण्याची इच्छा होईल व जेव्हा तो त्या नग्न मुलगी / महिलेसोबत संभोग केल्यानंतर खुश होईल तेव्हा करोड रुपये चा पाऊस पाडतो. अशाप्रकारे अनेक महिलांना / मुलींना आरोपीतांनी त्यांच्या जाळ्यात फसवले गेल्याचे अटक आरोपी यांच्याकडे केलेल्या तपासात दिसून येते. याप्रकारे मुलींना फसवणारी टोळी महाराष्ट्र विविध ठिकाणी पसरल्याचे दिसत असून त्या दृष्टीने तपास चालू आहे. Navi Mumbai Crime News
पोलीस पथक
अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त, गुन्हे- शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे (शोध -1) निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फराटे, महापुरे, पोलीस हवालदार नंदू पाटील, दीपक जाधव, शब्बीर फरार, नामदेव मुंडे, मुकणे, पोलीस नाईक गणेश बडगुजर, पोलीस शिपाई सागर सुरळकर, महिला पोलीस हवालदार सपकाळ, शेळके, वर्षा खरे सर्व नेमणूक गुन्हे शाखा घटक – 1 यांनी केली आहे. Navi Mumbai Crime News