नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नशामुक्ती केंद्राचे उद्घाटन, अभिनेता जॉन इब्राहिम उपस्थित
Navi Mumbai Breaking News : “नशा मुक्ती नवी मुंबई अभियान”देशभरात नशामुक्त भारत मोहीमेला सुरुवात झाली आहे. याचपार्श्वभूमीवर नवी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नशामुक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या Navi Mumbai Police अंतर्गत ‘नशामुक्त नवी मुंबई अभियाना’चा प्रारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात अनेक अभिनेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. CM Devendra Fadnavis या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमली पदार्थांवर भाष्य केलं. आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग्समुक्त करावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सन 2023 व सन 2024 मध्ये अंमली पदार्थ जवळ बाळगणे, सेवन करणे व खेरेदी-विक्री करणे यांचे एकुण 1133 गुन्हे दाखल करून एकुण 1750 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील 111 आफ्रिकन नागरिक आहेत. एकुण 56 कोटी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
तसेच सन 2023-24 मध्ये नवी मुंबईमध्ये अवैधरित्या राहत असलेल्या 1131 आफ्रिकन नागरिक व 224 बांगलादेशी नागरिक यांचेवर कारवाई करण्यात आली असुन त्यामधील एकुण 1128 आफ्रिकन नागरिकांना भारत देशातुन हद्दार करून परत पाठविले आहे.
समाजात अंमली पदार्थाच्या नशेबद्दल जागरूकता निर्माण करणे, विद्यालये, विदयापीठ कॅम्पस आणि शाळांना नशा मुक्त करण्याठी लक्ष केंद्रीत करणे, नशेच्या आहारी गेलेल्या तरूणांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा मुळ प्रवाहात आणुन नवी मुंबई शहर नशा मुक्त करण्यासाठी “नशा MUKTA FOREVER, SAY NO TO DRUGS, आणि” “DRUGS LENA BHUL HAI, CLEAN REHNA COOL HAI” असे संदेश देवुन जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विनंती नुसार ग्रॅन्ड अँबेसिडर (सदिच्छा युत) म्हणुन प्रसिध्द सिने अभिनेते जॉन अब्राहम हे सहभागी झाले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ” नशा मुक्त नवी मुंबई अभियान सुरू करताना नशे विरूध्दचे हे युध्द अदृश्य स्वरूपात आहे. जेव्हा आपल्याला शत्रु माहित असतो, तेव्हा आपल्याला त्यापेक्षा मोठे होवुन शक्तीने त्याचा पराभव करता येतो. परंतु अंमली पदार्थ विरोधी अभियान हे एक अदृश्य स्वरूपाचे युध्द असुन समाजाच्या सहभाग, मदत व पुढाकाराशिवाय जिंकता येत नाही. त्यामुळे नवी मुंबई पोलीसांनी सुरू केलेल्या नशा मुक्तीच्या युध्दात समाजाने सैनिक म्हणुन सामील व्हावे, असे आवाहन करून, नशा मुक्त नवी मुंबई अभियान हा उपक्रम यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाही.” अशा भावना व्यक्त केल्या.
नवी मुंबईतील नागरिकांसाठी आपली ओळख न सांगता ड्रग्स विषयी माहिती देणेकरीता हेल्पलाईन क्रमांक 8828 112 112 सुरू करण्यात आली आहे. ज्यावर ड्रग्ज विषयी माहिती देणा-याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल.
नवी मुंबई परिसरातील शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, बिझनेस पार्क, मॉल, हॉस्पीटल अशा विविध 200 ठिकाणी नशा मुक्त अभियानाचा संदेश देणारे डिजीटल बॅनर, होडींग लावण्यात आले आहेत.
नवी मुंबईमधील उच्च माध्यमिक विदयालय व कॉलेज मधील विदयार्थ्यांना एकुण 1200 टि-शर्ट वाटप करण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील बस, ऑटो रिक्षा तसेच पोलीस वाहने यावर नशा मुक्त नवी मुंबई अभियानाबाबत ट्रॅन्डींग करण्यात आले आहे.
नशा मुक्त नवी मुंबई अभियानाबाबत एक्स, फेसबुक, युटुब, इन्स्ट्राग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर सिने अभिनेता जॉन अब्राहम हे नशा मुक्ती अभियानाची जगजागृती करणार आहेत.
सोशल मिडीया Influencer, रेडीओ IVR, फोन IVR (रिंगटोन) व पथनाटयाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
ओला, उबेर या टॅक्सी सर्व्हस कंपनीचे अॅपद्वारे नशामुक्त अभियानाची जाहीरात करण्यात येत आहे.
नवी मुंबई डी. वाय. पाटील स्टेडीयमवर आयोजित होणा-या आंतरराष्ट्रीय रॉक बॅन्ड ‘कोल्ड प्ले’ या संगीत समोरोहामध्ये नशामुक्त अभियानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
आहे. नशा मुक्त नवी मुंबई