Navi Mumbai Bribe News : नवी मुंबई महावितरणाच्या अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा करंट
Navi Mumbai Anti Corruption Bureau Arrested Bribe Officer : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांची कारवाई ; महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंटला कमर्शियल मीटर बसवण्यासाठी लाच मागितली होती, रेस्टॉरंट मालकाची एसीबी कडे धाव
नवी मुंबई :- महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंटला कमर्शियल मीटर लावण्याकरिता पाच हजाराची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईमध्ये समोर आला आहे. रेस्टॉरंट मालकाने जुईनगर शाखा सेक्टर 15-16 वाशी प्रधान तंत्रज्ञ, दीपक मराठे, सहाय्यक अभियंता जुईनगर सेक्टर 15-16 वाशी सचिन फुलझडे यांच्या विरोधात ठाणे एसीबी Anti Corruption Bureau कार्यालयात तक्रार दिली होती. Navi Mumbai Anti Corruption Bureau
लाचलुचपत प्रतिबंध विभाग ठाणे Anti Corruption Bureau Thane यांनी तक्रारदार रेस्टॉरंट मालक यांनी त्यांच्या कमर्शियल मीटर बसवण्यासाठी दीपक मराठे प्रधान तंत्रज्ञ, आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी सचिन फुलझडे सहाय्यक अभियंता यांच्या दोघांसाठी पाच हजार रुपयाची लाच मागितली होती. त्यामध्ये दीपक यांना एक हजार रुपये आणि सचिन फुलझडे यांना चार हजार रुपये असे लाच मागितली होती. लाचलुचपत विभागाने 10 मे दीपक मराठे यांना रेस्टॉरंटच्या किचनमध्ये पाच हजार रुपये स्वीकारताना सायंकाळी 6.51 सुमारास रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये सहाय्यक अभियंता सचिन फुलझडे यांनी लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्यामुळे एसीबीने त्यांनाही अटक केली आहे. दोघांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करणे असून चौकशी एसीबी आणि पोलिसांकडून चालू आहे. Navi Mumbai Anti Corruption Bureau
लाचलुचपत प्रतिबंध ठाणे, विभागाचे मार्गदर्शन अधिकारी सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, ठाणे महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, ठाणे गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुंधती येळवे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई यांच्या पथकाने यशस्वी कामगिरी करत दोन भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेरबंद केले आहे. Navi Mumbai Anti Corruption Bureau