Navi Mumbai Anti- Corruption News : नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कार्यवाही ; महसूल सहाय्यक अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
•Navi Mumbai Anti Corruption News पनवेल तहसिल कार्यालय येथील महसुल सहाय्यक अधिकारी यांना लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात
नवी मुंबई :- पनवेल तहसिल कार्यालय,येथील महसुल सहाय्यक अधिकारी यांना लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.अटक केलेल्या महसूल सहाय्यक,किरण अर्जुन गोरे (48 वर्ष) आहे.तक्रारदार यांनी त्यांच्या वडीलोपार्जित शेती असलेली जमीन मुंबई कुळव्यवस्थापन व शेतजमिनी कायदे अंतर्गत जमीनीची नोंद कमी करून (भोगवटादार वर्ग-2) वरुन सदर जमीनीची भोगवटादार वर्ग – 1अशी दोन स्वतंत्र सर्व्हे कमांकाच्या जमिनीची नोंद करण्यासाठी सहाय्यक महसूल अधिकारी किरण गोरे यांने 1 लाख लाचेच्या रक्कमेची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी 4 मार्च रोजी Anti corruption Bureau नवी मुंबई कार्यालयात तक्रार दिली होती. शासकिय पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीच्या सत्यता पडताळणी दरम्यान गोरे यांनी तक्रारदारा यांचेकडे तडजोडीअंती 80 हजार लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. Navi Mumbai Anti- Corruption News
त्यानंतर दिनांक 14 मार्च रोजी लोकसेवक गोरे यांनी तक्रारदार यांचेकडे एका जमीनीच्या नोंदी करीता 40 हजार लाचेच्या रक्कमेची मागणी करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई यांनी आजमविलेल्या सापळा कार्यवाई दरम्यान लोकसेवक किरण अर्जुन गोरे यांनी तक्रारदार यांच्याकडून 40 हजार लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्यांना सायंकाळी 5.44 वाजता रंगेहाथ पकडले आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे. Navi Mumbai Anti- Corruption News