Uncategorized

Kashigaon Police Station : उप मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते काशीगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन

पालघर जिल्हा नियोजन समिती यांचेकडून प्राप्त वाहनांचा लोकार्पण सोहळा

मिरा रोड‌ :- (14 मार्च) राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातर्गत नवीन काशिगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन तसेच मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस दलासाठी वाहन लोकार्पण सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला. Kashigaon Police Station

पोलीस आयुक्त यांचा प्रस्ताव
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी केले. 2020 पासुन मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले असुन आयुक्तालयांतर्गत सुरुवातीला 13 पोलीस ठाणे कार्यान्वित होते. त्यावेळी 7 पोलीस ठाणी नव्याने निर्माण करणे प्रस्तावित होते. मागील 3 वर्षांत अनुक्रमे आचोळे, मांडवी, पेल्हार, नायगांव पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात येवून आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या आतापर्यंत 17 होती. आज पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पो. ठाण्याचे विभाजन करुन 18 व्या काशिगांव पोलीस ठाण्याचे उद्घाटन पार पडले असे सांगीतले. Kashigaon Police Station

13 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन आदेशाअन्वये मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली असून सदर आदेशामध्येच काशिमीरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून नविन काशिगांव पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काशिगांव पोलीस ठाण्याची हद्दनिश्चितीबाबत शासनस्तरावर अधिसुचना निर्गमित होणेकामी 17 नोव्हेंबर 2023 रोजी पोलीस महासंचालक यांच्या मार्फतीने शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास मंजुरी मिळुन त्याबाबतची अधिसुचना दि. रोजी निर्गमित करण्यात आली आहे. Kashigaon Police Station

पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ
काशिगांव पोलीस ठाण्याची निर्मिती मुळ काशिमीरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून करण्यात येत असून मुळ काशिमीरा पोलीस ठाण्याचे एकुण क्षेत्रफळ 29.90 चौ.कि.मी. होते. त्यापैकी सुमारे 20 चौ.कि.मी. एवढे क्षेत्रफळ काशिगांव पोलीस ठाण्याकडे वर्ग झाले असुन काशिमीरा पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ सुमारे 9.90 चौ. कि. मी. एवढे आहे. Kashigaon Police Station

गुन्ह्यांची नोंद
2023 मध्ये काशिमीरा पोलीस ठाणेत भाग 1 ते 5 अंतर्गत दाखल गुन्हयांची संख्या 622, भाग 6 अंतर्गत 170 व भाग 3 अंतर्गत 57 गुन्हे एवढी आहे. तसेच सन 2023 मध्ये काशिमीरा पोलीस ठाणेस दाखल अदखलपात्र गुन्हयांची संख्या 3170 एवढी आहे.स्टेशन उद्घाटन व पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण अनुषंगाने पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, मिरा भाईंदर वसई-विरार, पोलीस आयुक्तालय यांचे अभिनंदन केले. Kashigaon Police Station

पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) श्री. जयंत बजबळे हे उपस्थित होते.तसेच ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे, मिरा-भाईंदर विधानसभा सदस्या गिता जैन, माजी आमदार मुजफर हुसैन, मिरा-भाईंदर महानगरपालीका आयुक्त संजय काटकर हे काशिगाव ठाण्याचे उदघाटन प्रसंगी वेळात वेळ काढून उपस्थित राहीले. Kashigaon Police Station

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0