Bangladeshi Citizens Arrested : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 5 बांगलादेशी नागरिक अटक

•Navi Mumbai Bangladeshi Citizens Arrestedनवी मुंबई बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 5 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
नवी मुंबई :- कोपरखैरणे परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने कोपरखैरणे परिसरातील एका निवासी इमारतीवर छापा टाकून चार महिला आणि एका पुरुषाला अटक केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
घुसखोरी प्रकरणाची माहिती देताना कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, घुसखोरांच्या चौकशीदरम्यान हे सर्व बनावट कागदपत्रांच्या मदतीने भारतात घुसल्याचे आढळून आले. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या चार महिलांचे वय 34 ते 45 वर्षे आहे.या चारही महिला जवळच्या घरात घरकाम करत होत्या, तर 38 वर्षीय पुरुष येथे रंगकाम करायचे. पोलिसांनी सांगितले की, घुसखोरांविरुद्ध आयपीसीच्या कलमांनुसार फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तसेच पासपोर्ट (भारतात प्रवेश) नियम-1950 आणि परदेशी कायदा-1946 च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.