जबरी चोरीचा गुन्हा उघड करण्यास नवघर पोलीस ठाण्यास यशजबरी चोरीचा गुन्हा उघड करण्यास नवघर पोलीस ठाण्यास यश
Mira Bhayandar Crime News Navghar Police Arrested Criminal : जबरदस्तीने खिशातून दहा हजार रुपयाची चोरी, पोलिसांनी आरोपीला केले अटक
मीरा – भाईंदर :- बेरोजगारी आणि गुन्हेगारी यामुळे शहरातील मोठ्या प्रमाणात गुन्हे सत्रात वाढ होत आहे.03 रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. गुन्हयातील फिर्यादी मोखई रामप्रसाद निशाद, (45 वर्षे) भाईंदर पूर्व, मुळ रा. जि.अंबेडकर नगर, राज्य उत्तरप्रदेश हे मजुरीचे काम करतात. 31 मार्च रोजी सायंकाळी 04.00 वा.चे सुमारास फिर्यादी हे नवघर फाटक रोडवर असलेल्या चर्चजवळील बस स्टॉप, भाईंदर पूर्व येथुन जात असतांना दोन अनोळखी इसमांनी ठोश्याबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांचे खिशातुन 10 हजार रुपये रोख रक्कम जबरीने चोरी करुन पळुन घेवुन गेलेबाबत फिर्यादी यांनी नवघर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारवरुन भा.दं.वि.सं. कलम-394,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mira Bhayandar Crime News
बाब ही गंभीर असल्याचे लक्षात घेवुन मा. पोलीस उप-आयुक्त. परिमंडळ-01, सहाय्यक पोलीस आयुक्त. नवघर विभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक,नवघर पोलीस ठाणे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुशंगाने गुन्हे प्रकटीकरपण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी प्रथम गुन्हयाचे घटनास्थळाला भेट देवून गुन्हयाचे ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन नमुद सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता सदरचा गुन्हा नवघर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील आरोपी नामे गौरव संभाजी सुर्यवंशी, (23 वर्षे),याला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हातील मद्देमाल हस्तगत करण्यात आला असून. गुन्हा हा विधीसंघर्षग्रस्त बालक याचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. Mira Bhayandar Crime News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-01, राजेंद्र मोकाशी सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचा मार्गदर्शनाखाली धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पालवे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार भुषण पाटील, संतोष पाटील, सुरेश चव्हाण,नवनाथ घुगे, पोलीस शिपाई ओंकार यादव, पोलीस शिपाई सुरजसिंग घुनावत,अस्वर, पवार तसेच कुणाल हिवाळे यांनी केलेली आहे.Mira Bhayandar Crime News