नवघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ; ५ किलो गांजा जप्त एका आरोपीला केले जेरबंद
Navghar Police Arrested Person With 5 KG Ganja : नवघर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी ‘गांजा’ या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या इसमास 5 किलो 500 ग्रॅम रक्कम 1 लाख 05 हजार रुपये किमतीच्या गांजा अंमली पदार्थ रंगहाथ पकडला
मीरा – भाईंदर :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस Vasai Virar Police आयुक्तालयाच्या हद्दीतील गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थ Drug Supply तस्करी खरेदी विक्री यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला आहे .(03 एप्रिल) पोलीस उपनिरीक्षक तुषार मोळोदे यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, नवघर कॅबिन क्रॉस रोड, रेल्वे पटरी जवळील गटारीचे बाजुला भाईंदर पुर्व येथे इसम नामे राजेंद्र उपेंद्र चौहाण, रा. विरार हा त्याचे ताब्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ Drugs चोरुन लपून विक्रीकरीता घेवून येणार आहे. Mira Bhayandar Crime News
सदरची बातमी लागलीच पोलीस उपनिरीक्षक तुषार माळोदे यांनी दिवसपाळी कर्तव्य पोलीस निरीक्षक अशोक कांबले यांना कळवून तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांना व्यक्तीची कारवाई करणेकरीता परवानगी मिळणेबाबत पत्रव्यहार करुन छापा कारवाई बाबत नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी यांचे मार्गदर्शन प्राप्त करुन पोलीस निरीक्षक अशोक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक तुषार माळोदे, पोलीस हवालदार गणेश जावळे, कुमार राठोड, पोलीस शिपाई अमित तडवी, मुकेश निकम, अमोल पाटील यांनी दिनांक 03 एप्रिल रोजी 10.05 वा. पंचांसमवेत नवघर कॅबिन रोड, रेल्वे पटरी जवळील गटारीचे बाजुला अंधारात सावधगिरी बाळगुन दबा धरुन थांबले असता, इसम नामे राजेंद्र उपेंद्र चौहाण, (24 वर्षे) पालघर यास 05 किलो 500 ग्रॅम रक्कम 1 लाख 5 हजार रुपये किमतीचा गांजा (कॅनबीस) अंमली पदार्थासह रंगेहाथ पकडुन त्याचे विरुध्द नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करुन आरोपीत यास सदर गुन्हयात अटक करुन उल्लेखनिय कागमगिरी बजावली आहे. Mira Bhayandar Crime News
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1, सहाय्यक पोलीस आयुक्त . नवघर विभाग तसेच नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक तुषार माळोदे, पोलीस हवालदार गणेश जावळे, पोलीस हवालदार कुमार राठोड, पोलीस शिपाई अमोल पाटील, मुकेश निकम, पोलीस शिपाई अमित तडवी सर्व नेमणुक नवघर पोलीस ठाणे यांनी केली आहे. Mira Bhayandar Crime News