Navaratri 2024 Color In Marathi: शारदीय नवरात्री 3 ते 12 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुरू होईल. या 9 दिवसांमध्ये 9 रंगांचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ आहे.
मुंबई :- यंदाच्या वर्षी शारदीय नवरात्र Navaratri 2024 गुरुवार, 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे,
- पिवळा रंग हा परिधान करणे शुभ राहील. हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो. पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाईल.
- लाल रंग हा ‘ब्रम्हचारिणी’ देवीचा आवडता रंग लाल आहे आणि हा रंग शक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.
- निळा हा ‘चंद्रघंटा’ देवीचा आवडता रंग आहे. हा रंग साहस आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
- ‘अष्टभुजा’ देवीचा आवडता रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा संपत्तीचा, स्नेहाचे प्रतीक आहे.
- स्कंदमाता देवीचा आवडता रंग हिरवा आहे. हा रंग, सौभाग्य, समृद्धीचे प्रतीक आहे.
- करडा रंग हा राक्षस महिषासुराचा वध करणारी देवी कात्यायनी देवीचा आवडता रंग आहे. करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे.
- देवी पार्वतीचे सातवे रुप म्हणजे काली माता देवीचा आवडता रंग नारंगी आहे. नारंगी रंग हा बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.
- मोरपंखी हा रंग महागौरी देवीचा आवडीचा रंग आहे. हा रंग मयूरता, सुंदरता, दृढ विश्वास आणि समृध्दीचे प्रतीक आहे.
- गुलाबी रंग हा सिध्दीदात्री देवीचा आवडता रंग गुलाबी आहे. महत्वाकांक्षा, आणि प्रेमाचे प्रतीक म्हणजे सद्भावाचे प्रतिक आहे.