Nashik Accident News : नाशिकमध्ये दुधाचा टँकर 200 फूट खोल खड्ड्यात पडला, 5 ठार, 4 गंभीर जखमी
Nashik Mumbai Highway Accident News : नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाट परिसरात दुधाचा टँकर सुमारे 200 ते 250 फूट खोल खड्ड्यात कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले.
नाशिक :- नाशिकमध्ये रविवारी Nashik Milk Car Accident दुधाचा टँकर खोल खड्ड्यात पडून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. नवीन कसारा घाटाजवळ हा अपघात झाला. तर 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. परिसरात मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या साहाय्याने खाली उतरून तीन गंभीर जखमींना खड्ड्यातून बाहेर काढले. यानंतर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तीन ते चार जण अजूनही दरीत अडकले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नैनीज धाम मोफत रुग्णवाहिका रुग्णमित्र कैलास घाटीर यांनी जखमींना इगतपुरी व कसारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे.
अक्षय विजय घुगे ( 30 वर्ष), श्लोक जायभाय ( 5 वर्ष), अनिकेत वाघ (21 वर्ष), मंगेश वाघ (वय 50 वर्षे) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कसारा व उपजिल्हा रुग्णालय शाहपूर येथे उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये विजय घुगे (60 वर्ष,रा. निमोण तालुका संगमनेर,) आरती जायभाय (31 वर्ष रा. नालासोपारा,) सार्थक वाघ (20 वर्ष,रा. निहाल तालुका सिन्नर) रामदास दराडे (50 वर्ष) यांचा समावेश आहे. , सिन्नर येथील रहिवासी योगेश आढाव राहुरीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे