मुंबई

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांच्या हस्ते 20 बॉडीवॉर्न कॅमेऱ्यांचे वाटप!

•Mumbai Police News पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते 20 बॉडीवॉर्न कॅमेरा कैमेन्यांचे वाटप करण्यात येत, लवकरच 200 बॉडीवॉर्न कॅमेऱ्यांचे वाटप करण्यात येणार आहे

मीरा रोड :- पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील वाहतुक विभागाच्या अधिकारी व अंमलदार यांना 20 बॉडीवॉर्न कॅमेरा कॅमे-यांचे वाटप करण्यात आले असून असे एकूण 200 बॉडीवॉर्न कॅमेऱ्यांचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या 100 दिवसाच्या विकासा आराखडाच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत आजच्या डिजिटल युगात वाहतुक पोलीसांना अधिक प्रभावीपणे आपले कर्तव्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयातील वाहतुक पोलीस अधिकारी व अंमलदारांना बॉडीवॉर्न कॅमेरा हे उपकरणाचा वापर सुरु करण्यात येत आहे. उपकरणाला बॉडी वॉर्न व्हिडिओ (BWV) व बॉडी वॉर्न कॅमेरा (BWC) असेही म्हणतात. हि एक वेअरेबल ऑडिओ व्हिडिओ किया फोटोग्राफिक रेकॉर्डिंग सिस्टम असुन सदर उपकरणाच्या माध्यमातुन वाहतुक पोलीस एकमेकांशी सहजपणे जोडले जाणार असुन कायदयाची अंमलबजावणी करणाऱ्या वाहतुक पोलीस अधिकारी व अंमलदारांना घटनास्थळावरिल घटना व्हिडीओ ऑडीओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरात येणार आहे.

हे उपकरण हे वाहतुक पोलीस कर्तव्य करीत असतांना त्याच्या छातीवर खांदयावर किया कमरेला लावलेले असेल यातुन वाहतुक पोलीसांचे जनतेशी झालेला संवाद व व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी-अंमलदार व नागरिक अशी दोघांचीही जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होणार आहे. तसेच लाईव्ह ॲक्शनमध्ये असतांना जलद प्रतिसाद पथकाला सुचना देण्यासाठी तसेच अपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांचे लोकेशन समजण्यासाठी, ट्रॅफिक जंक्शन, महामार्ग किंवा इतर संवेदनशील ठिकाणावरील लाईव्ह घटना रेकार्ड करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होणार आहे. तसेच, वाहतुक नियमांचे उल्लंघन याबाबत व्हिडीओ, ऑडीओ पुरावे गोळा करण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारे सदर उपकरणाचे उद्दिष्ट म्हणजे पारदर्शकता वाढवणे आणि पोलिस-जनता संबंध मजबुत करणे आहे.

मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, यांच्या हस्ते मिरा-भाईंदर, वसई-विरार,दत्ता शिंदे, अपर पोलीस आयुक्त,सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, वाहतुक विभागाचे पोलीस अधिकारी-अंमलदार यांच्या उपस्थितीत हे कार्य संपन्न झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0