महाराष्ट्रमुंबई

Madha Lok Sabha : मुख्यमंत्री शिंदे यांना मोठा झटका, करमाळ्याचे माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?

Narayan Patil Will Join NCP Sharad chnadra Pawar Party :  लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार आहे.

मुंबई :- लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांना मोठा झटका बसला आहे. माढा लोकसभा Madha Lok Sabha मतदारसंघात शरद पवार Sharad chnadra Pawar यांनी महायुतीला मोठा धक्का दिला आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील Narayan Patil आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश Will Join NCP करणार आहेत.

नारायण पाटील हे आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सदस्य होते, पण आता त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण पाटील यांच्यासह करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती, पंचायत समितीचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी ग्रा.पं. सदस्य, गावचे सरपंच शरद गटात सामील होणार आहेत.

नारायण पाटील हे शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आदींसह करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दाखल होणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. Madha Lok Sabha Update

नारायण पाटील यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करताना करमाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. 2009 मध्ये त्यांनी जनसुराज्य पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि 2014 मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवून ते आमदार झाले. Madha Lok Sabha Update

नारायण पाटील हे करमाळा तालुक्यातील प्रभावी नेते आहेत. 2019 मध्ये शिवसेनेने त्यांची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यांना प्रचंड मते मिळाली. तरीही त्यांनी शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतला, मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेण्याचा निर्णय घेतला. Madha Lok Sabha Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0