Nallasopara Crime News : पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश ;देशी बनावटी रिव्हॉल्वर जवळ बाळगणाऱ्या आरोपीस अटक
•Nallasopara Crime News बेकायदेशीर रिव्हॉल्वर जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली
नालासोपारा :- देशात सध्या लोकसभेचे Loksabha Election Update वारे वाहू लागले आहेत आजच पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान झाले आहे या मतदार दरम्यान कोणत्याही प्रकारे विविध रित्या वृत्त केल्यास पोलिसात म्हणून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली वसई मध्ये एक व्यक्ती हे कायदेशीर रित्या बंदूक बाळगल्या प्रकरणी आरोग्य अटक केले आहे.पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत (18 एप्रिल 2024 रोजी 5.30 वा. च्या) सुमारास जाबरपाडा, पेल्हार गाव, नालासोपारा पूर्व या ठिकाणी एक व्यक्ती रिव्हॉल्वर घेवुन येणार असल्याची खात्रीशीर माहीती गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाली होती. सदर बाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांनी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना माहिती दिली असता त्यांनी बातमीची सत्यता पडताळून कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश व सुचनापर मार्गदर्शन केले होते. Nallasopara Crime News
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, व पथक यांनी सापळा रचुन बेकायदेशिर अवैध बंदूक (अग्निशस्त्र) बाळगणारा इरफान अज्वर खान, (27 वर्षे) (नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर) यास ताब्यात घेऊन त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात 35 हजार रु.कि.चा एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर मिळून आले असुन सदर बाबत पेल्हार पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) (3),135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Nallasopara Crime News
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ 3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त , विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शकील शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, निखील मंडलिक, संजय मासाळ, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Nallasopara Crime News