पुणे
Trending

Pune News | होळी, शिवजंयतीच्या पार्श्वभूमीवर नांदेडसिटी पोलिसांकडून रूट मार्च

पुणे, दि. ११ मार्च, महाराष्ट्र मिरर : Pune News

होळी, धुलीवंदन व शिवजयंती नागरिकांना निर्विघ्नपणे साजरा करता यावी यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेडसिटी पोलिसांकडून आज रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या नेत्तृत्वाखाली 2 सपोनि, पोउपनिरीक्षक, 22 अंमलदार, 15 होमगार्ड व आरसीपी क्र. 03 सहभागी झाले होते.

आज दिनांक 11 रोजी सायंकाळी ५ वा ते ७ वा चे दरम्यान पोलीस उप आयुक्त परिमंडळ 03 व सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हद्दीत आगामी येणाऱ्या होळी, धुलीवंदन, शिवजयंती या सण-उत्सव अनुषंगाने रुट मार्च घेण्यात आला.

रूटमार्च जेपी नगर येथून सुरू होऊन किरकटवाडी चौक – किरकटवाडी गावठाण- युटर्न मारुन परत किरकटवाडी चौक – कोल्हेवाडी चौक – खडकवासला कार्नर – लमाण वस्ती- खडकवासला गावठाण- खडकवासला चौपाटी भागात रुटमार्च घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0