मुंबईक्राईम न्यूज

Nallasopara Crime News : अवैध देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगणाऱ्या आरोपीस अटक

Nallasopara Crime News पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश ; आरोपीकडून 02 देशी बनावटीचे पिस्टल व 02 जिवंत काडतुसे जप्त.

नालासोपारा :- सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई बाबतचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत 31 मार्च रोजी गुन्हेप्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार गस्त करत असतांना 2.30 वा. च्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून एक इसम मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 08 वरील वसई फाटा येथील ब्रिजच्या खाली विना परवाना देशी बनावटीचे पिस्टल घेऊन येणार असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, यांनी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना माहिती दिली असता त्यांनी सदर बातमीची सत्यता पडताळून कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश व मार्गदर्शन केले होते. Nallasopara Crime News

Nallasopara Crime News

पेल्हार पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचुन बेकायदेशिर अवैध पिस्टल बाळगणारा इसम अभिषेक अनिल यादव, (19 वर्षे), नालासोपारा यास ताब्यात घेऊन त्याची दोन पंचासमक्ष इझडती घेतली असता त्याच्या ताब्यात 40 हजार रु.किं. चे एक देशी बनावटीचे पिस्टल, 01 जिवंत राऊंन्ड, 01 फायटर, एक 500 रुपये दराची भारतीय चलनातील नोट, एक चिन्द्रन बैंक ऑफ इंडीयाची 500 रुपये दराची नोट, एक 5 हजार‌ रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण 45 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला असून सदरबाबत पेल्हार पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), (3), 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Nallasopara Crime News

सदर गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीत यास अटक करुन त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडील फोन मधील गॅलरी मध्ये असलेल्या अनेक गावठी कट्टा देशी पिस्टल, राऊन्ड यांचे फोटो दिसुन आल्याने त्याचे राहत्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये आणखी एक देशी बनावटीचे 40 हजार रु.कि.चे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळुन आल्याने ते गुन्हयाचे तपास कामी जप्त करण्यात आले असुन गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे. Nallasopara Crime News

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, श्रीकांत पाठक, अप्पर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, संजय मासाळ, मिथुन मोहिते, निखील मंडलिक, किरण आव्हाड, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड,सुजय पाटील, नितीन सांगळे, पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Nallasopara Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0