मुंबई

Nalasopra News : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी नालासोपाऱ्यातील 34 बेकायदा इमारतींवर बुलडोझर चालवण्यात येणार आहे.

Nalasopra Illegal Room Notice News : नालासोपाऱ्यातील 41 पैकी 34 बेकायदा इमारती 22 जानेवारीपर्यंत खाली करण्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. शेकडो रहिवाशांनी आपली घरे वाचवण्यासाठी आमदार राजन नाईक यांच्याकडे धाव घेतली. हायकोर्टाने 31 जानेवारीपर्यंत कारवाईचा अहवाल मागवला आहे.

नालासोपारा :- नालासोपाऱ्यातील 41 बेकायदा इमारतींचा बहुचर्चित मुद्दा पुन्हा तापला आहे. 7 इमारती पाडल्यानंतर महापालिकेने Nalasopra BMC Room Notice आता 34 इमारती पाडण्यासाठी रहिवाशांना 22 जानेवारीपर्यंत घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.कारवाईदरम्यान कोणताही त्रास होऊ नये यासाठी 400 पोलीस कर्मचारी तैनात करण्याची तयारी करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त मोहन संखे यांनी दिली आहे. येथे नोटीस मिळाल्यानंतर पुन्हा एकदा रहिवाशांची झोप उडाली आहे.

आपली घरे वाचवण्यासाठी शेकडो रहिवाशांनी मंगळवारी नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांचे कार्यालय गाठून मदत मागितली. घर वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन नाईक यांनी दिले आहे. यावेळी महिला मोठ्याने रडू लागल्या.

नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल नगरी येथील लक्ष्मी नगरमध्ये डम्पिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लांटसाठी आरक्षित जागेवर 41 बेकायदा इमारती बांधण्यात आल्या आहेत. एका जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने या इमारती बेकायदेशीर ठरवून त्या पाडण्याचे आदेश दिले आहेत.यातील काही इमारती जीर्ण झाल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात महापालिकेने यातील सात इमारती पाडल्या आहेत. उर्वरित 34 इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांनी कारवाईच्या निषेधार्थ घरे सोडलेली नाहीत. त्यामुळे कारवाई थांबली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0