नालासोपारा : ड्रग्ज विकणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला सापळा रचून अटक ; 2.69 लाखांचा अंमली पदार्थ जप्त
Nalasopra Achole Police Arrested Drug Seller : नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती आचोळे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना मिळाली होती
नालासोपारा :- मोफेड्रोन पावडर (एम.डी.) ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियन व्यक्तीला नालासोपारा येथील आचोळे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पोलिसांनी अटक केली आहे. Nalasopra Achole Police Crime Branch या नायजेरियन व्यक्तीकडून पोलिसांनी दोन लाखांहुन अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे.याबाबत पोलीस अधिक तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आचोळे पोलीस ठाण्याच्या Achole Police Station हद्दीमध्ये अंमली पदार्थ विक्री सेवन, बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य तसेच नायजेरियन नागरिकांकडून होणाऱ्या ड्रग्ज विक्री बाबत कारवाई करण्याचे सूचना पोलिसांना दिल्या होत्या. आचोळे पोलिसांच्या मोठ्या प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या परिसरात घस्ती घालत असताना एक नायजेरियन व्यक्ती मोफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. कॅनरा बँक एटीएम चे समोर रेल्वे स्थानकाजवळ यावेळी पोलिसांनी संशयास्पद वावरत असलेल्या एका नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून पोलिसांनी मेफेड्रॉन (एम.डी.) सापडली असता पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आचोळे पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. ॲन्थोनी विजीको न्वाफोर, (वय 46) असे या नायजेरियन व्यक्तीचे नाव असून नालासोपारा मधील रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 22.2 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) 2 लाख 39 हजार 340 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याने हे अंमली पदार्थ कुणाला विक्री करण्यासाठी आणले होते? त्याने हे कोणाला विक्री केले आहेत? या प्रकरणात कुठली मोठी टोळी सक्रीय आहे का? याचा तपास पोलीस करत आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डचे, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2, उमेश माने-पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सुजितकुमार पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आचोळे पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक विशाल खैरे (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे, पोलीस हवालदार दत्तात्रय दाईंगडे, शंकर शिंदे, पोलीस अंमलदार निखील चव्हाण, विनायक कचरे, अमोल सांगळे, मोहनदार बंडगर, मनोज पाईकराव, गोविंद गुट्टे, लोकेश कुवर, महिला पोलीस शिपाई जनाबाई हिवाळे यांनी यशस्वी रित्या केलेली आहे.