Nalasopara Mobile Robbery : रक्षाबंधनाची अनोखी भेट ; हरविलेले 22 मोबाईल फोन तक्रारदारांना परत

Pelhar Police Station Return Stolen Mobile : पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी ; रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर हरविलेले मोबाईल फोन तक्रारदार यांना परत मिळवून देण्यास यश
नालासोपारा :- रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर पेल्हार पोलीस ठाण्याच्या Pelhar Police Station गुन्हे प्रकटीकरण विभागाने एक अनोखे गिफ्ट दिले आहे. मोबाईल फोन हरविलेले परत मिळवून देण्यास यश आले आहे.3.50 लाखांचे 22 मोबाईल फोन तक्रारदार यांना परत करण्यास गुन्हे प्रकटीकरण विभागाला यश आले आहे. हरविलेले मोबाइल परत मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला आहे. Nalasopara Mobile Robbery News

हरवलेले व चोरलेले मोबाईलचा शोध घेण्यासाठी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी विशेष मोहिम राबवण्याबाबत सचूना दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अशा मोबाईल फोनच्या CEIR या पोर्टल द्वारे तांत्रिक बाबींच्या आधारे एकूण 22 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन शोधण्यास आली आहे. साडेतीन लाख रुपयांचे किंमतीचे मोबाईल फोन तक्रारदार यांना परत देण्यास पोलिसांना यश आले आहे. Nalasopara Mobile Robbery News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रेय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शकील शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, किरण आव्हाड, निखील मंडलिक, राहुल कर्पे, अभिजित नेवारे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, सर्व नेम. पेल्हार पोलीस ठाणे पोलीस हवालदार नामदेव ढोणे, पोलीस अंमलदार सोहेल शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे