नालासोपारा : महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणारा महिला आरोपी अटकेत, पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांची कारवाई

Nalasopra Police Busted Sex Racket : महिलांना पैशांचे आमिष दाखवत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिला वेश्यादलाला पोलिसांनी अटक केली.
नालासोपारा :- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग नालासोपारा यांनी मोठी कारवाई करत पैशांचे आमिष दाखवत महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिला वेश्यादलाला पोलिसांनी अटक केली. Nalasopra Police Arrested Sex Racket Dealer आरोपीला अटक करतानाच पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून याप्रकरणी पोलीस Nalasopra Police News अधिक तपास करीत आहेत.
नालासोपाराच्या वसंत नगरी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. वैजांती सुरेश वाकचौरे (33 वय रा. कुलाबा कफपरेड, मूळ रा. पाथर्डी , अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिला वेश्यादलालांचे नाव आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोगस ग्राहकांमार्फत वैजयंती वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शरीरसुखासाठी मुलींची मागणी केली. त्यानंतर वैजयंती यांनी एका मुलीकरीता 6200 रुपये मागितले होते. बोगस ग्राहकाने तीन मुलींची मागणी केली होती. त्यानंतर वैजयंती यांनी बोगस ग्राहकाला मुलींचे फोटो दाखविले असता पोलिसांनी छापा टाकून वेश्या दलाल महिलेला अटक केली आहे. तसेच दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
आचोळे पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143 (2) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे महिला आरोपी वैजयंती सुरेश वाघचौरे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, सहाय्यक फौजदार गवई, महेंद्र शेट्ये, महिला पोलीस हवालदार तिवले, पोलीस हवालदार श्याम शिंदे,सुनिल पागी, सर्व नेमणुक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.