क्राईम न्यूजमुंबई

Nalasopara Crime News : वाईन शॉप दुकानात चोरी, तब्बल 55 लाखांहून अधिक किंमतीची चोरी

Nalasopara Wine Shop Crime News : नालासोपारा पोलीस ठाण्याचे कामगिरी ; आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 25 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

नालासोपारा :- वाईन शॉप दुकानात (wine Shop Thief) चोरी झाली असून त्यातून जवळपास 55 लाख किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे घटना नालासोपारा पोलीस ठाण्यात (Nalasopara police Staion) दाखल झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनेचा तपास करणे सुरुवात केली असून नालासोपाराच्या पोलिसांनी आरोपीला आणि आरोपीकडून 25 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची कामगिरी पोलिसांनी केली आहे.श्रीप्रस्था झिरो रोड येथे मनोज मोहन कामत यांचे जिमखाना वाईन शॉप दुकानातील डॉक्टर मधील आणि ऑफिसमध्ये तिजोरीचे सोने हिरे माणिक मोती रोख रक्कम असा एकूण 56 लाख 65 हजार किमतीचा ऐवज चोरीला गेला होता. कामत यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात (Nalasopara Crime Station) तक्रार दाखल केली होती.त्याच्या तक्रारीवरून भादवि कलम 450,380,411 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्यता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिसांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी अंमलदार यांनी पुण्याचा तपास सुरू केला. घटनास्थळी माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचे आरोपी हा रामनिवास मंजू गुप्ता जो कल्याणच्या खडेगोलवली परिसरात राहत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती परंतु आरोपी हा मोबाईल बंद करून सातत्याने आपले वास्तव्य लपवत असल्याचे होता. आरोपीला गुजरात राज्याच्या वडोदरा येथून अटक केली असून सदर गुन्हा केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून 496.25 वजनाचे 25 लाख 08 हजार 796 किमतीच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. Nalasopara Crime News

पोलीस पथकाची कामगिरी

जयंत बजचळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-03, विजय लगारे, सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा यांचे मार्गदर्शनाखाली विजयसिंह बागल, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे, सचिन कोतमिरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक अख्तर शेख, पोलीस हवालदार/अंमलदार हिरालाल निकुंभ, किशोर धनु, प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाडुलकर, प्रेम घोडेराच, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडीत मस्के, वालीच पो.स्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, सध्या नेम. नवघर पो.स्टे. तसेच पोलीस उप आयुक्त कार्यालय, परीमंडळ 3. विरार कार्यालयातील पोलीस हवालदार नामदेवच ढोणे, सोहेल शेख यांनी कामगिरी करत लाखोचा डल्ला मारणारे आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. Nalasopara Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0