मुंबई

Nalasopara Crime News : शहरात थरकाप! दोन पिस्तुलं, जिवंत काडतुसेसह युवक अटकेत — खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई

•हॉटेलसमोर पिस्तुल घेऊन येतोय’ – गुप्त माहितीवरून सापळा

नालासोपारा | शहराच्या प्रवेशद्वारावर अक्षरशः थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. खंडणी विरोधी पथकाच्या सतर्क कारवाईत दोन पिस्तुलं, पाच जिवंत काडतुसे आणि मोबाईलसह तब्बल 89 हजारांचा अवैध शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी उत्तरप्रदेशातील 20 वर्षीय युवकास ताब्यात घेण्यात आलं असून शहरात अवैध शस्त्र आणण्यामागील उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

12 जूनच्या रात्री 10.40 वाजता अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील यासोंचा गाव येथील हॉटेलसमोरच्या पानटपरीवर एक युवक पिस्तुल घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार खंडणी विरोधी पथकाने तत्काळ सापळा रचला आणि विशाल धर्मेंद्र कनोजिया (वय 20, रा. बुधनपूर, जि. आझमगड, उत्तरप्रदेश) याला रंगेहात ताब्यात घेतलं.

तपासात विशालकडून 2 अग्नीशस्त्रे, 5 जिवंत काडतुसे, 2 रिकाम्या मॅग्झीन आणि मोबाईल असा एकूण 89 हजार 700 रुपयांच्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकरणाचा तपास काशीगाव पोलीस ठाणे करत असून, आणखी कोणी सहभागी आहेत का, याचा छडा घेतला जात आहे.

पोलीस पथक

पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ, पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयेंद्र आंबवडे, पोलीस उपनिरीक्षक ओंकार कोचे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील पठाण, पोलीस हवालदार राजवीर संधु, सतिष जगताप, राजाराम काळे, सुनिल गोमासे, शरद पाटील, अनिल नागरे, अकिल सुतार, पोलीस अंमलदार साकेत माघाडे खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0