Nalasopara Crime News : घरफोड्या करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना पोलिसांनी भाईंदरमधून केली अटक

•पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी ; तीन आरोपी अटक, एक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहे
नालासोपारा :- पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने कारवाई करत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यामधील एका आरोपीवर पाच गुन्हे घरफोडी संदर्भात दाखल आहे. पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 ऑगस्ट च्या दरम्यान गोविंद नारायण पांडे (40 वर्ष) यांच्या धुमाळ नगर, वसई येथील दुकानांमध्ये ड्रॉव्हरमध्ये ठेवलेल्या पाच लाख रुपये रोख आणि एक्टिवा मोटरसायकल चोरी झाल्याची तक्रार पेल्हार पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (अ),331(2),331(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे चार पथक तयार करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून घटनास्थळी ते भाईंदर पर्यंत तब्बल दीडशे सिटी फुटेज पाहणी करून आरोपी बाबत पोलिसांना गोपनीय व तांत्रिक मदतीच्या आधारे माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 लाख 10 हजार 400 रुपये हस्तगत करण्यात आले आहे.
आरोपींची नावे
1.रोहित रमेश चव्हाण, (21वर्ष रा. भाईंदर)
2.अनिल श्री पाल,(22 वर्ष रा
भाईंदर )
3.विश्वनाथ विरेंद्र यादव, (28 वर्ष रा.भाईंदर)
आरोपी रोहित चव्हाण यांच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यासह इतर एकूण सहा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रेय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मिरा- भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, जयंत बजचळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2 विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव चादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शकील शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, किरण आव्हाड, निखील मंडलिक, राहुल कर्पे, दिलदार शेख, अभिजीत नेवारे, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, सर्च नेम. पेल्हार पोलीस ठाणे तसेच पोहवा/नामदेव डोणे, सोहेल शेख पोलीस उप आयुक्त कार्यालय परिमंडळ 03 यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.