Uncategorized

Nalasopara Crime News : पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश ; खुनाच्या गुन्हयात फरार असलेल्या मुख्य आरोपीस राज्य उत्तरप्रदेश येथून अटक करण्यात

Nalasopara Crime News Pelhar Police Arrested Mureder Criminal From UP : धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारले

नालासोपारा :- पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दि. 12 मार्च 2024 रोजी रात्रौ 12.30 वा. चे सुमारास माँ दुर्गा माता मंदिराजवळ, विशाल पांडेनगर व हमीद कम्पाऊंड गौराईपाडा संतोषभवन, नालासोपारा पालघर येथे आरोपी 1) रोहन सिंग, 2) मर्दा (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) 3) पिचळया रंगाचा टि शर्ट च जिन्स पेंन्ट परिधान केलेला इसम व त्याचे सोबतचे 6/7 इसम (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांनी मयत सुधीर कुंजबिहारी सिंग, (27 वर्षे) हिन्दुस्थान नाका, कांदीवली पूर्व, मुंबई यास रिक्षात जबरदस्तीने टाकुन मारहाण करत घेऊन जाऊन धारधार हत्याराने वार करुन जिवे ठार मारले बाबत दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी 12.59 तक्रारदार वैभव रमेश मिश्रा, (28 वर्षे), रा. संतोष भुवन, नालासोपारा पूर्व ता.यसई जि. पालघर यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पेल्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा भा.दं. वि.सं. कलम 302,364,141,143,144,147,148,149,120 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. Nalasopara Crime News

गुन्हयाचे गांर्भीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांना आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना गुन्हयाचे कामी अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना देऊन आदेशित केले होते. वरिष्ठांचे आदेशान्वये पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी तांत्रिक माहितीच्या व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी 1) सुरज लल्लन चव्हाण, (25 वर्षे), 2) साहिल तिलकु विश्वकर्मा, (21 वर्ष) 3) अखिलेश सुनिल सिंग ऊर्फ अक्की (27 वर्ष) सर्व रा. संतोषभवन नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर यांना सिंहगड, पुणे येथून दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी ताब्यात घेऊन त्यांना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा घडल्यापासुन सदर गुन्हयातील मुख्य आरोपीत राहुल पाल ऊर्फ मर्दा हा फरार झाला होता. Nalasopara Crime News

सदर गुन्हयातील मुख्य आरोपी राहूल पाल ऊर्फ मर्दा याचा शोध घेणे घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र यनकोटी यांनी आदेश दिले होते. सदर आदेशान्वये पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्हयातील फरार आरोपी यांच्याबाबत तांत्रिक माहिती प्राप्त केली. आरोपी हा राज्य उत्तर प्रदेश येथे असण्याची शक्यता असल्याने पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी/अंमलदार हे सदर आरोपीत याचा शोध घेण्यासाठी जि. भदोई राज्य उत्तरप्रदेश येथे गेले. उत्तरप्रदेश येथिल भदोई जिल्हयातील चौरीबाजार या ठिकाणी आरोपीताबाबत अधिकची माहिती प्राप्त करुन सदर आरोपीत हा रामपुर जि. जौनपुर राज्य उत्तरप्रदेश येथे असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ रामपुर पोलीस ठाणे जि. जौनपुर येथिल पोलीसांच्या मदतीने आरोपीत याचा साकरी या गायात रात्रीवेळेस शोध घेत असताना त्यास पोलीसांची चाहुल लागल्याने तो जंगलात पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. Nalasopara Crime News

पोलीस पथक

जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ 3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त , विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अविनाश देसाई, फिरोज तडवी, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, संजय मासाळ, मिथुन भोईर, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, पेल्हार पोलीस ठाणे तसेच पोलीस हवालदार नामदेव ढोणे, सोहेल शेख पोलीस उप आयुक्त कार्यालय, परीमंडळ-3 यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0