मुंबई

Nalasopara Crime News : सामूहिक बलात्कार प्रकरणी 22 वर्षापासून फरार असलेल्या नराधामाला अटक..

Nalasopara Crime News मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई ; नालासोपारा येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी 22 वर्षानंतर केले अटक, 2002 ची घटना

नालासोपारा :- 2 जानेवारी 2002 रोजी नालासोपारा पूर्व येथील 22 वर्षांपूर्वी एक 26 वर्षीय सोनी सोबत आपसांत संगनमत करुन जबरदस्तीने रिक्षात कोंबून नालासोपारा पूर्व येथील तानीया टाऊनकडे जाणाऱ्या रस्तावर नेऊन 4 जणांनी आळीपाळीने जबरी संभोग केला. तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला, तसेच त्या तरुणीला लाथा बुक्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर सदर पीडित तरुणेकडून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासात आरोपीमध्ये 2 आरोपीना अटक करण्यात आली. यामध्ये राजु भुपनराय राठोड आणि धिरज ब्रम्हानंद गिरी या दोन जणांना अटक करण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यामधील 2 आरोपी शंकर आणि मायकल गुन्ह्याच्या दिवसापासून फरार आहेत.

फरार आरोपीला शोधण्याचे वरिष्ठानने दिले निर्देश

गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने तसेच नमुद गुन्हयातील फरार आरोपी शंकर तसेच मायकल यांचा यापूर्वी सर्वोतोपरी शोध घेऊन देखील ते गेल्या 22 वर्षांपासून शोध चालू होता. परंतु हे दोन्ही अपराधी पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी होत होते. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुले राख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, संतोष मदने, पोहवा. राजाराम काळे, हनुमंत सुर्यवंशी तसेच पोलीस शिपाई अकिल सुतार यांचे पथक तयार केले. पोलीस पथकाने गुन्हयाची नालासोपारा पोलीस ठाण्यातून गुन्हयाची माहीती घेऊन आरोपीचा शोध सुरू केला.

आरोपी मंदिरात असल्याचे पोलिसांना माहिती, पोलिसांच्या एक महिन्याच्या परिश्रमानंतर 22 वर्षांपासून फरार आरोपीला केले अटक

पहिले आरोपीचा शोध घेत असताना मायकल याचे नांव मायकल ऊर्फ टिप्पु राम शिरोमण पाण्डेय असे असल्याची माहीती गुप्तबातमीदाराकडून समजली. त्यांनतर सलग 01 महिन्यांपासुन अहोरात्र मेहनत घेऊन तपासात सातत्य ठेवून आरोपीची गोपनीय माहिती काढली असता आरोपी हा नालासोपारा परीसरातच रिक्षा चालवित असल्याची आणि कोणत्यातरी मंदीरात राहत असल्याची माहीती पोलिसांच्या हाती लागली. पोलीस पथकाने मागील 05 दिवसांपासून सतत ऑटो रिक्षा स्टॅन्ड, नालासोपारा रेल्वे स्टेशन येथे बातमीदारासह पाळत ठेवून सापळा रचून फरार आरोपी मायकल ऊर्फ टिप्पु राम शिरोमण पाण्डेय यास दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 3.00 वा. शिताफिने याला ताब्यात घेतले.

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेन्द्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंन्द्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेथे पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, संतोष मदने, हनुमंत सुर्यवंशी, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, राजविर संधु, प्रविणराज पवार, सतिष जगताप, राजाराम काळे, महेश वेल्हे, संग्राम गायकवाड, अनिल नागरे, पोशि, अखिल सुतार, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुळे, मसुब सचीन चौधरी सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांच्यामार्फत ही कामगिरी पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0