Nalasopara Crime News नालासोपारा पोलिसांनी 56 मोबाईल शोधले
नालासोपारा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे यशस्वी कामगिरी ; चोरीला गेलेले आणि हरविलेले 56 मोबाईल फोन शोधून तक्रारदारांना परत देण्यास यश
नालासोपारा :- नालासोपारात रहिवाशांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याचे आणि हरवल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर नोंद होत होत्या. या अनुषंगाने वरिष्ठ पोलिसांनी नालासोपारा परिसरात हरविलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पोलीस अधिकारी अंमलदार यांनी नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेले आणि हरवलेला मोबाईल फोन तपास हाती घेण्यात आले होते. पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत जवळपास 56 मोबाईल परत शोधून नागरिकांना परत देण्याचे यशस्वी कामगिरी बजावली आहे
नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल मोठ्या कौशल्य आणि तांत्रिक माहित आधारे वेगवेगळ्या राज्यांमधून आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून जवळपास 56 मोबाईल फोन पोलिसांनी यशस्वीरित्या शोधून काढले आहेत. ज्याची किंमत दहा लाख 71 हजार 799 असून पोलिसांनी परत केली आहे.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 विजय लगारे,सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, साहेब फौजदार हिरालाल निकुंभ, पोलीस हवालदार किशोर धनु, प्रशांत साळुंखे, अमोल तटकरे कल्याण बाचकर,राजेश नाटुलकर, प्रेम घोडेराव यांनी यशस्वी कामगिरी करत नागरिकांचे मोबाईल शोधून दिली आहे.