Nalasopara Crime News : अनैतिक संबंधातून महिलेचा खून, अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे गूढ 72 तासात उलगडले
•कंडोम च्या पाकिटावरून आरोपीचा शोध, अनैतिक संबंधातून झाला खून
नालासोपारा :- पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकास अज्ञात महिलेचा मृतदेहाचे रहस्य फुलगाडून आरोपीला 72 तासात दिल्लीहून अटक केले आहे. अनैतिक संबंधातून खून झाल्याचा पोलिसांना संशय संशय सार्थ ठरण्यास पोलिसांची यशस्वी कामगिरी केली आहे. 28 मे च्या सकाळी नऊ वाजेच्या सुमारास धोदाडा डोंगराच्या खाली असलेल्या ओव्हळात हरवटेपाडा, धानिवबाग नालासोपारा येथे एका महिलेचा जिथे अंदाजे 30 ते 35 वयाची असून तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारून डोंगराच्या खाली असलेल्या ओव्हळात आणून टाकला होता. या संदर्भातली माहिती शेतकरी दिलीप हरवटे यांनी दिली होती. सदर घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी स्वतः तपासाचे सूत्र हाती घेऊन घटनास्थळी जाऊन महिलेच्या ओळख पटवण्यासाठी तिच्या शेजारील काही पुरावा मिळतो का या उद्देशाने पोलिसांनी शोध घेतला सुरुवात केली शोध घेण्यास सुरुवात केली.
कंडोम च्या पाकिटावरून आरोपीचा शोध
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह कोणे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान पाटील प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी मयत महिलेच्या मृतदेहाजवळ वापरलेले कंडोम वापरलेले पोलिसांना आढळले. त्या कंडोमच्या मदतीने पोलिसांनी परिसरातील आजूबाजूच्या मेडिकल मध्ये जाऊन विचारपूस करणे सुरुवात केली. पोलिसांना शोध घेत असताना धानिवबाग परिसरातील एका मेडिकल शॉप मधून अज्ञात आरोपी याने कॉन्डोम आणि स्प्रे खरेदी केल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला तेव्हा 24 मे च्या सकाळी आठ वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान एक व्यक्ती कॉन्डोम विकत घेऊन जात असताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांना महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्याकरिता नालासोपारा पूर्व परिसरातील मतदार यादी प्राप्त केल्या मतदारसंघावरून ती मुस्लिम असल्याचे पोलिसांच्या लक्षात येतात मुस्लिम नावाची यादी पोलिसांनी शॉर्टलिस्ट केली त्यावरून घेण्यास सुरुवात केली धानीवबाग तलाव येथे राहणाऱ्या जियाउल्लाह म्हातायु शाह याचे घरी दोन लहान मुले दिसुन आली. व त्यांचे सोबत कोणीही नव्हते त्यामुळे आजुबाजूस अधिक तपास केला असता जियाउल्लाह म्हातावु शाह हा पोलीस ठाण्यात गेला असून त्याची पत्नी हि सुमारे तीन दिवसापासून बेपत्ता असल्याचे समजले. त्यामुळे इसम जियाउल्लाह म्हातायु शाह (22 वर्ष) रा. धानिवबाग तलावाजवळ, यांची भेट घेवून त्यांना मयत महिलेचे फोटो दाखवले असता त्यांनी सदरची मयत महिला हि त्यांची पत्नी सायरा बानू जियाउल्लाह शाह वय (34 वर्ष) असे असल्याचे सांगितले.मेडीकल शॉप मध्ये मिळून आलेल्या अनोळखी इसमाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले असता त्याने तो व्यक्ती हा त्यांचा भाचा नजाबुद्दीन मोहम्मद सम्मी,( 21 वर्ष), (सध्या रा. अमनविहार दिल्ली मुळ रा.ग्राम गीरहिह, पो. धोचहा, तहसिल इटावा, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) हा असल्याचे सांगुन त्यांची मयत पत्नी व भाचा नजाबुद्दीन यांचे सुमारे दोन वर्षापासून अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
आरोपीला दिल्लीतून ताब्यात
नजाचुद्दीन याचे मोबाईल फोनचे तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती प्राप्त करुन लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील प गुन्हे प्रकटीकरण पथक टिम दिल्ली येथे रवाना केली. त्यांनी इसम नजबुद्दीन मोहम्मद सम्नी, यांचा स्थानिक पोलीसांच्या मदतीने दिल्ली येधिल अमनयिवहार पोलीस ठाणे हद्दीत त्यांचा शोध घेत असतांना आरोपीत हा बेकरीमध्ये काम करत असल्याबाधत माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी रात्रीभरात सुमारे 10 ते 100 बेकऱ्या तपासून आरोपी याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक तपास केला असता त्यानेच मयत महिलेस अनैतिक संबंधावरुन आपसात वाद झाल्याने दिनांक 27 मे रोजी 12.30 वा. च्या सुमारास एका धारदार चाकूने तिचा गळा चिरुन छातीत चाकु खुपसून जीवेठार मारुन पळून गेला असल्याबाबत सांगितले, आरोपीत यांस दिनांक (31 मे ) रोजी अटक करुन गुन्हा उघड़किस आणला आहे.