क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Sex Racket : सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश‌ , वेश्या दलाल अटक, दोन पिढीत महिलेची सुटका नालासोपारा पोलिसांची कामगिरी

Nalasopara Police Busted Sex Racket : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांची कारवाई ; वेश्यादलाला पोलिसांनी केले अटक, दोन पीडित महिलेची सुटका

नालासोपारा :- कळंब बीच रोड, दामोदर फार्म हाउस जवळ, बुधाजी स्टॉप, नालासोपारा अर्नाळा पोलीस ठाणे Arnala Police Station हद्दीतील याठिकाणी एक पुरुष वेश्यादलाल हा वेश्यागमनाकरीता कळंब बीच रोड दामोदर फार्म हाउस जवळ नालासोपारा पश्चिम येथे मुली पुरविणार असल्याची गोपनीय माहीती अनैतीक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळाली होती.पोलीस पथक, बोगस गिन्हाईक व दोन पंच असे सदर ठिकाणी जावुन 30 मे रोजी कारवाई करुन पुरुष वेश्यादलाल Sex Racket राहुल अमीन अकबर अली सद्दर यास अटक करून दोन महीला पिडीतांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षास यश आलेले आहे.Nalasopara Sex Racket News

पोलिसांनी केला‌ पर्दाफाश
बोगस गि-हाईक तयार करून त्यास नमुद वेश्यादलाल याचेकडे मिळालेल्या माहीतीच्या आधारे वेश्यादलाल राहुल याचे मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन वेश्यागमनासाठी मुलीची मागणी केली असता त्याने सांगितले की, मी एका मुलीचे 5 हजार रु. घेतो. आपणास कबुल असेल तर कळंब बीच रोड, दामोदर फार्म हाउस जवळ, बुधाजी स्टॉप नालासोपारा पश्चिम येथे येण्यास सांगितल्यावर बोगस गि-हाईक याने त्यास होकार दिला. त्यानंतर बोगस गि-हाईक हा पंचासह कळंब बीच रोड, दामोदर फार्म हाउस जवळ, बुधाजी स्टॉप येथे गेले असता वेश्यादलाल राहुल अमीन अकबर अली सद्दर याने बोगस गि-हाईकास दोन महीला दाखवल्या व त्यामधुन तुम्ही पसंद करा व माझे कमिशन व वेश्याव्यवसाय मोबदला म्हणून मला ठरल्याप्रमाणे पैसे दया असे सांगितल्यावर बोगस गि-हाईक याने पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे एक महीला पसंद करुन छापा पंचनाम्यातील ठरल्याप्रमाणे त्यास पैसे दिले असता बोगस गि-हाईक याने पोलीस पथकास कन्फरमेशन इशारा दिला असता दोन पंचासह ठिकाणी जावून छापा टाकला त्यामध्ये एक पुरुष दलाल आरोपी नावे राहुल अमीन अकबर अली सद्दर (28 वर्षे) यास ताब्यात घेतले. व दोन महीला पिडीत यांची वेश्याव्यवसाया पासुन सुटका केली आहे. Nalasopara Sex Racket News

महिलांची आर्थिक फसवणूक
वेश्यादलाल नावं राहुल अमीन अकबर अली सद्दर (28 वर्ष) (रा. अंरिंज हॉस्पिटल जवळ पडीक बिल्डींग मध्ये, भाईंदर पूर्व) हा मुळचा पश्चिम बंगाल येथे राहणारा होता याने पिडीत महीलांना पैशाचे आमिष दाखवुन वेगवेगळ्या ग्राहकांना बोलावून त्यांचेकडुन पैसे घेवून पिडीत महीला यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले व वेश्यागमनाचा मोबदला व कमीशन मिळून असे एकुण एका महीलेचे पाच हजार घेत व त्यातील 500 रुपये पिडीत महीलांना देत असतो. Nalasopara Sex Racket News

आरोपीला अटक अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिडीत महिला यांची वेश्याव्यवसायाच्या दलदलीतून सुटका करून दलाल आरोपी यास अटक करून अर्नाळा पोलीस ठाणे भादविस कलम 370(1) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5प्रमाणे आरोपी राहुल अमीन याचेवर गुन्हा दाखल केला आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथकाची कामगिरी
पोलीस उप आयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा यूनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार सहाय्यक फौजदार पवार, गवई, महिला पोलीस हवालदार डोईफोडे पोलीस हवालदार शेट्ये, पागी, महिला पोलीस हवालदार तिवले, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई पाटील, सर्व नेम.अन.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा विभाग यांनी केली आहे. Nalasopara Sex Racket News

Web Title : Mumbai Sex Racket: Police busted a sex racket, arrested a prostitute, rescued a woman in two generations, Nalasopara police performance

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0