Nalasopara Crime News : पाच बांगलादेशींना अटक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाची धडक कारवाई
•Five Bangladeshi arrested from Nalasopara अनैतिक मानवी वाहतूक विभाग यांची नालासोपारा भागात मोठी कारवाई केली आहे.नालासोपारा भागातून पाच बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या पाचही जणांकडे भारतात वास्तव्याचे कुठलेही पुरावे आढळून आले नाही.
नालासोपारा :- गणेशोत्सवाच्या दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. तसेच शहरांमध्ये कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांची करडी नजर होती. Nalasopara Crime News अशीच एक मोठी कारवाई नालासोपारा भागात करण्यात आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या नालासोपारा शाखेने नालासोपारा भागातून पाच बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या पाचही जणांकडे भारतात वास्तव्याचे कुठलेही पुरावे आढळून आले नसून, अत्यंत संशयास्पदरित्या ते हट्टी ग्राउंडच्या बाजूला झोपडपट्टीत सोपारा गाय वाजा मोहल्ला, इदगा तलावाजवळ हड्डी मैदान नालासोपऱ्यात राहत होते.
अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार आणि त्यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाचही बांगलादेशी नागरिक असून, ते अवैधरित्या नालासोपाऱ्यात राहत होते. पोलिसांनी छापेमारी करत पाच आरोपींना अटक केली आहे. Nalasopara Crime News त्यांच्यावर भारतीय पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3(अ), 6(अ) सह विदेशी अधिनियम 1946 चे कलम 14 प्रमाणे नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दहा बारा वर्षापूर्वी बांग्लादेशात बेकारी असल्याने त्यांच्या कुटुंबास सोडून मुंबईला कामानिमित्त बांगलादेशातून नदीच्या मार्गाने अनधिकृतपणे भारतात आले असता सध्या नालासोपारा या ठिकाणी राहत असून, सध्या बिगारीचे काम करीत आहेत असे त्यांनी सांगितले आहे.
अटक आरोपींची नावे
1.अर्षद रहमततुल्ला गाजी (52 वर्ष)
2.अलीमोहमद दिनमोहमद मंडल (56 वर्ष)
3.मिराज साहेव मंडल (19 वर्ष)
4.साजाद कादीर मंडल (45 वर्ष)
5.साहेच पंचानन सरदार (45 वर्ष)
नालासोपाऱ्यात पकडलेले पाच बांगलादेशी महाराष्ट्रात कुठून आले, यांना कोणी आणले, यांच्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे, आणखी किती बांगलादेशी या परिसरात वास्तव्याला आहेत, याचा सर्व तपास आता नालासोपारा पोलीस करत आहेत.
पोलीस पथक
पोलीस उप-आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ (गुन्हे शाखा), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार तसेच पोलीस हवालदार किणी, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार शेटये, पागी, महिला पोलीस हवालदार तिवले, महिला पोलीस शिपाई पाटील सर्व नेम, अनै, मा, वा. प्र. कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे.