क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road Murder News : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पंजाबमधून अटक

Mira Road Latest News : मिरारोड पूर्वेला स्टेशन परिसर व आजूबाजूच्या परिसरात बेकायदा फेरीवाले लावून त्यात हप्ता (खंडणी) गोळा करण्याचा प्रकारच्या वादातून डोक्यात गोळी झाडून हत्या झाली होती.

मिरा रोड :- मिरारोड पूर्वेला स्टेशन परिसर व आजूबाजूच्या परिसरात बेकायदा फेरीवाले लावून त्यात हप्ता गोळा करण्याचा प्रकारच्या वादातून 3 जानेवारी महिन्यात डोक्यात गोळी झाडून हत्या झाली होती. Mira Road Latest Crime News त्यानंतर आरोपी फरार झाला होता. मागच्या काही महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत आरोपी हा पंजाब मध्ये लपून बसला होता. पोलिसांनी आरोपीचा तांत्रिक तपास करून अटक करत बेड्या ठोकल्या आहेत.

मिरारोड स्टेशन Mira Road Station News बाहेर शांती शॉपिंग सेंटरमध्ये 3 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास इब्राहीम शेख, ऊमर रमजान सोलंकी व मोहम्मद शम्सतबरेज शहाबुद्दीन अन्सारी ऊर्फ सोनु हे आपापसांत बोलत असताना शूटर सचिनकुमार साहु ऊर्फ राठोड याने येवून मोह. शम्सतबरेज शहाबुद्दीन अन्सारी ऊर्फ सोनु याच्या डोक्यात गोळी मारली. त्याचा खून करून तो पळून गेला होता.

मोहम्मद युसुफ मन्सुरअली आलम आणि मयत यांच्यात मिरारोड परिसरात फेरीवाल्यांचा धंदा लावण्याचे पूर्व वैमनस्यावरुन वाद-विवाद असल्याने आरोपी सैफअली मन्सुरअली खान, मोहम्मद युसुफ मन्सुरअली आलम, तब्बसुन परविन मोहम्मद इस्तेकार याच्या सांगण्यावरुन सचिन कुमार साहू ऊर्फ राठोड याने मयत शम्स तबरेज अन्सारी ऊर्फ सोनु ह्याच्या डोक्यास डावे बाजुस पीस्टलने फायर करुन त्यास जीवानिशी ठार मारले. या घटनेनंतर नयानगर पोलीस खुनाचा व हत्यार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटना ही गंभीर बाब असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याचा तपास काशीमिरा गुन्हे शाखा करत होती. त्यांनाही सदरील आरोपी हा मिळून येत नव्हता. तसेच गुन्हयातील मुख्य पाहीजे आरोपी सचिनकुमार साहु ऊर्फ राठोड हा गुन्हा दाखल झाल्यापासून मिळून येत नव्हता. त्यामुळे गुन्हा उघडकीस येणे बाकी होते.सदर गुन्हयातील आरोपी बाबत कोणताही ठावठिकाणा नसल्यामुळे गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेऊन खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी सदर पाहिजे आरोपीचा शोध घेणेकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयेंद्र आंबवडे, सहाय्यक फौजदार शकील पठाण, पोलीस हवालदार राजवीर संधु यांचे तपास पथक तयार केले. नमुद पथकाने फरार आरोपी बाबत संपूर्ण माहिती प्राप्त करुन त्याबाबत तांत्रीक विश्लेषण करुन आरोपी याचे ठावठिकाणाबाबत अधिक माहिती प्राप्त केली.गुन्ह्यातील फरार आरोपी सचिनकुमार साहु ऊर्फ राठोड हा (जि.भटिंडा राज्य पंजाब) येथे असल्याबाबत संशय निर्माण झाल्याने नमूद पथकाने वरिष्ठांचे परवानगीने पंजाब या ठिकाणी जावून आरोपीचा स्थानिक पोलीसांच्या मदतीने शोध घेतला असता तो तलवंडी साबो (जि. भटिंडा) येथे मिळून आल्याने त्याला ताब्यात घेवून प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी, (तलवंडी साबो, जि. भटिंडा) येथे हजर करुन ट्रांन्झीट रिमांडद्वारे पुढील तपासकामी काशीमिरा गुन्हे शाखा कक्ष-1 यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0