पुणे

Murlidhar Mohol : धक्कादायक : मुरलीधर मोहोळ यांच्या संपत्तीत 400 टक्क्यांनी वाढ

Murlidhar Mohol Income News : मुरलीधर मोहोळ यांच्या संपत्तीत 400 टक्क्यांनी वाढ, सात वर्षात पाच कोटींवरून 24 कोटी संपत्ती

पुणे :- भाजपाचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांच्या संपत्तीत सात वर्षात 400 टक्क्याने वाढ झाली आहे. विरोधकांना आणि लोकसभेच्या निवडणुकीत Pune Lok Sabha Election आयता मुद्दा भेटला आहे. सात वर्षांपूर्वी मोहोळ यांची संपत्ती जवळपास चार कोटी होती आणि 2024 लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती 24 कोटीवर गेल्याचे जाहीर केले आहे. ऐन निवडणुकीतच संपत्तीचा मुद्दा विरोधकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपाचे मोहोळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, तर वंचित बहुजन आघाडी कडून मनसेकडून फारकत घेतलेले वसंत मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे. मोहोळ यांनी दिलेले कर्जही वादग्रस्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरकुल मध्ये भ्रष्टाचार केलेले डीएसके यांच्या जावयाला 77 लाख रुपयांचे कर्ज हे वादाचे ठरू शकतात. त्यामुळे मोहोळ यांच्या संपत्तीत अचानक एवढी वाढ झाली कशी असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात त्यामुळे त्यांना निवडणुकीची संधी मिळाली असे सार्वत्रिक चर्चा बोलली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने त्यांना महापौर पदाची ही जबाबदारी देण्यात आल्याचे त्यावेळी बोलले जात होते. Pune Lok Sabha Election News

भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे 24 कोटी 32 लाखांची संपत्ती आहे. मोहोळ यांच्यावर 13 कोटी 58 लाख रूपयांचे कर्ज आहे. मोहोळ कुटुंबावर एकूण 14 कोटी 85 लाखाचे कर्ज असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना दिलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. स्थावर मालमत्ता 19 कोटी 5 लाख 67 हजार 695 आहे. जंगम मालमत्ता 5 कोटी 26 लाख 76 हजार 788 रुपये आहे. या प्रकारे मोहोळ यांच्याकडे 24 कोटी 32 लाख 76 हजार 788 रुपयांची संपत्ती आहे. मुरलीधर मोहोळ यांच्यावर 13 कोटी 58 लाख 69 हजार 977 तर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांच्यावर 1 कोटी 26 लाख 78 हजार 900 रुपयांचे कर्ज आहे. मुळशी तालुक्यातील मुठा गाव, कासार आंबोली, भूगाव आणि वाई येथे मिळून एकूण 5 एकर 15 गुंठे जमीन आहे. मोहोळ यांच्याकडे इनोव्हा गाडी आहे. मोहोळ यांच्या 66 लाख 74 हजार रुपयांच्या ठेवी आणि 29 लाख 45 हजारांचे दागिने आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे 9 हजार 192 रोख तर पत्नी मोनिका मोहोळ यांच्याकडे 12 हजार 124 रुपये रोख रक्कम दाखविली आहे.

मुरलीधर मोहोळांची राजकीय कारकीर्द?

  • मुरलीधर मोहोळ यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली आहे.
  • पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी 2002, 2007, 2012 आणि 2017 झाले आहेत
  • 2019- 2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते.
  • उपाध्यक्ष, अखिल भारतीय महापौर परिषद
  • पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष 2017-2018
  • संचालक, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) -2017-2018
  • संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) 2017-2018
  • सभासद, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) 2017-2018
  • 2009 मध्ये खडकवासला (पुणे) मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवार

Murlidhar Mohol Income Video Link = https://www.instagram.com/reel/C6wTv76PY3C/?igsh=MXR6Y3Y1cGcwcmN5eA%3D%3D

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0