Mumbra Cyber Crime : हाॅटेल रेटिंगचे ऑनलाइन काम देण्याची थाप, वेबसाईटद्वारे कमीशनच्या आमिषातून 40 हजारांची फसवणूक

Mumbra Cyber Crime News : महिलेला टेलिग्राम वरती मेसेज करून गुगल वर विविध हॉटेल साठी रेस्टॉरंटला रेटिंग रेव्ह्यू आणि कमेंट देण्याचे टास्क पूर्ण केल्यास पैशाचे आमिष
मुंब्रा :- मुंब्रा येथे राहणाऱ्या महिलेला एका अज्ञात व्यक्तीने टेलिग्राम वर संर्पक करुन ऑनलाइन काम मिळवून देताे असे सांगितले. Mumbra Cyber Crime त्यानुसार हाॅटेलला रेटिंग टास्क देण्याचे बहाण्याने एकूण 40 हजार रुपये ऑनलाइन गुंतवणुकीस घेऊन फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून 319 (2),318(4),बी.एन.एस.सह कलम 66 क,ड आयटीआय अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मुंब्रा पोलिसांनी तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांच्या मदतीने टेलिग्राम आयडी याची माहिती प्राप्त करून तसेच त्याच्या आय पी डी आर तसेच डबल वापरण्यात आलेला अकाउंट ची माहिती प्राप्त करून पोलिसांनी मोबाईल नंबरचा सीडीआर आणि आयपीआर तसेच ई-मेल आयडी चा तांत्रिक तपास घेऊन पोलिसांनी कुर्ला पश्चिम येथील बुद्ध कॉलनी येथे छापा टाकला असता. पोलिसांना तेथे चार आरोपी आढळून आले, पोलिसांनी आरोपींकडून चार मोबाईल फोन, 37 एटीएम कार्ड, 36 चेक बुक, तीन लॅपटॉप, तीन पासबुक, 16 सिम कार्ड इत्यादी साहित्य जप्त केले आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा रिमांड घेतला असून पुढील चौकशी चालू आहे.