मुंबई
Trending

Mumbai Traffic Update: वानखेडे स्टेडियमवर रंगणार मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर यांचा 67 वा सामना रंगणार

Mumbai Traffic Update: मुंबई पोलीस उप आयुक्त वाहतूक प्रज्ञा जेडगे यांनी खबरदारी म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये केले बदल

मुंबई :- वानखेडे स्टेडियम वर मुंबई विरुद्ध लखनऊ असा आयपीएलचा 67 (Mumbai vs Lucknow) वा सामना रंगणार आहे या सामन्यात वाहतूक कोंडी लक्षात घेताच पोलीस उप आयुक्त प्रज्ञा जेडगे यांनी खबरदारी म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच वानखेडे स्टेडियम मध्ये पार्किंग (No Parking Near Wankhade Stadium) व्यवस्था नसल्याने क्रिकेट प्रेमींनी सामना बघण्याकरिता सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असा आवाहन करण्यात आले आहे. Mumbai Churchgate Traffic Update

वाहतूक व्यवस्था मध्ये कशाप्रकारे बदल करण्यात आला आहे खालील प्रमाणे

वाहतूकीच्या मार्गातील बदल

अ) ‘डी’ रोड हा एन. एस. रोड वरील (मरीन ड्राईव्ह) जंक्शन ते ‘ई’ व ‘सी’ रोड जंक्शनपर्यंत एक दिशा (पश्चिम-पूर्व) (One Way) मार्ग राहील.

ब) (पश्चिम पुर्व) (One Way) मार्ग राहील गरज भासल्यास.’एफ’ रोड हा एम. एस. रोड वरील (मरीन ड्राईव्ह) जंक्शन ते ‘ई’क्रॉस रोड जंक्शनपर्यंत एक दिशा

क) ‘ई’ रोड हा एन. एस. रोड वरील (मरीन ड्राईव्ह) जंक्शन ते ‘ई’ व ‘सी’ रोड जंक्शनपर्यंत एक दिशा (दक्षिण वाहिनी) (One Way) मार्ग राहील.

पार्किंग निबंध (No Parking Area Near Churchgate)

१) ‘सी’ रोडवर उत्तर बाजु एन. एम. रोडच्या जंक्शनपासून “ई” रोडच्या जंक्शनपर्यंत गरज भासल्यास

२) ‘डी’ रोडवर एन.एम. रोडच्या जंक्शनपासून “ई” रोडच्या जंक्शनपर्यंत

३ ) ‘ई’ गेडवर ‘डी’ रोडच्या जंक्शनपासून ‘सी’ रोडपर्यंत

४) ‘एफ’ रोडवर एन.एम. रोडच्या जंक्शनपासून ‘ई’ क्रॉसरोड जंक्शनपर्यंत.

५) ‘जी’ गेडवर दक्षिण बाजु एन. एम. रोडच्या जंक्शनपासून ‘ई” क्रॉसरोडच्या जंक्शनपर्यंत गरज भासल्यास

६ ) ‘ई’ क्रॉमगेडवर ‘एफ’ रोड जंक्शनपासून’ जी’ रोडच्या जंक्शनपर्यंत

७) एन.एम. रोडवर (दक्षिण व उत्तर वाहिनी) मफतलाल बाथ मिग्नल ते एअर इंडिया जंक्शनपर्यंत

८) वीर नरीमन रोडवर (दक्षिण व उत्तर वाहिनी) चर्चगेट जंक्शन ते सुदंरमहल जंक्शनपर्यंत

९) वरील नमुद ठिकाणी वाहने पार्क केल्यास ई-चलान कारवाई करुन वाहने कर्षित करण्यात येतील.

वानखेडे स्टेडिअमच्या सुरळीत मार्गक्रमणाकरीता खालील सुचनांचे पालन करावे

अ) वानखेडे स्टेडिअम गेट क्रमांक ०१,०२ व ०७ चे टिकीट असणाऱ्या प्रेक्षकांनी चर्चगेट रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर उतरून ‘डी’ रोडने इच्छितस्थळी जावे.

ब) वानखेडे स्टेडिअम गेट क्रमांक ०४ व ०५ (अ) वे टिकीट असणाऱ्या प्रेक्षकांनी मरीन लाईन्स रेल्वे स्टेशन‌ प्लॅटफॉर्मवर उतरुन ‘एफ’ रोडने इच्छितस्थळी जावे.

क) वानखेडे स्टेडिअम गेट क्रमांक ०३ चे टिकीट असणाऱ्या प्रेक्षकांनी चर्चगेट रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर उतरुन एन. एस. रोडने इच्छितस्थळी जावे.

ड) एन. एस रोडवरून पायी चालत येणाऱ्या प्रेक्षकांनी रोड वरून न चालता फुटपाथचा वापर करावा.

३) एन.एस रोडवरून वाहनांनी येणाऱ्या प्रेक्षकांनी दिशादर्शक चिन्हानी दर्शविलेल्या चढ-उतार ठिकाणांवाव चढ-उतारा करीता वापर करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0