Mumbai Traffic Update : मनसेच्या गुढीपाडव्याला पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल, पोलीस उप आयुक्त समाधान पवार यांचे निर्देश
Mumbai Traffic Update Mumbai Police Traffic Update during Maharashtra Navnirman Sena Gudi Padva Meting : मनसैनिकासाठी पोलीसांकडून आवाहन, वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे मंगळवार (9 एप्रिल ) रोजी शिवाजी पार्क, येथे “पाडवा मेळावा” आयोजित करण्यात आलेला आहे. पाडवा मेळाव्याानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर नागरीक हे मोठया प्रमाणात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून वेगवेगळया वाहनातून ‘पाडवा मेळावा’ कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग व पुर्व द्रुतगती महामार्गावर तसेच कार्यक्रमस्थळी जाण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची होण्याची शक्यता आहे. वाहतूक सुरळीत राखण्याकरिता वाहतूक पोलिसांकडून खालीलप्रमाणे वाहनांच्या पार्किंगवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. सदर वाहतुकीचे निर्बंध 9 एप्रिल रोजी दुपारी 01.00 ते रात्री 12 पर्यंत अंमलात राहतील. Mumbai Traffic Update
वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते
- स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, (श्री. सिद्धीविनायक मंदीर जंक्शन ते यस बैंक जंक्शन)
- केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), दादर.
- एम. बी. राऊत मार्ग,
- पांडुरंग नाईक मार्ग, (रोड नं. 5)
- दादासाहेब रेगे मार्ग,
- दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोड) दादर
- एन. सी. केळकर मार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक), दादर
पाडवा मेळावा करीता येणाऱ्यांस सुचना
पाडवा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या वाहनांना निर्देशित केलेल्या ठिकाणापासून निश्वित केलेल्या वाहनतळ ठिकाणी पार्क करावीत.
पश्चिम आणि उत्तर उपनगरे पश्चिम आणि उत्तर उपनगरे येथून पश्चिम द्रुतगती मार्गाने येणारी वाहने सेनापती बापट मार्गाने माटुंगा रेल्वे स्थानक येथे आलेनंतर माटुंगा रेल्वे स्थानक ते रुपारेल कॉलेज यादरम्यान मेळाव्यास येणारे नागरिकांना उतरुन वाहने रेती बंदर, माहिम, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर पीपीएल पार्किंग, कामगार मैदान, सेनापती बापट मार्गावर तसेच हलकी वाहने कोहिनुर पीपीएल पार्किंग मध्ये पार्क करु शकतात.
पुर्व उपनगरे : ठाणे, नवी मुंबई येथून पुर्व द्रुतगती मार्गाने येणारी वाहने दादर टी. टी. सर्कल येथे उतरुन वाहने पाच गार्डन-माटुंगा आणि आरएके ४ रस्ता येथे पार्क करावी.
शहरे व दक्षिण मुंबई :- वीर सावरकर रोड मार्गे दक्षिण मुंबई कडून येणाऱ्या वाहनांना रविंद्रनाथ नाटय मंदिर येथे उतरुन वाहने इंडिया बुल्स फायनान्स पीपीएल पार्किंग, आप्पासाहेब मराठे मार्ग. तसेच बी. ए. रोड मार्गे येणाऱ्या वाहनांनी दादर टी. टी सर्कल येथे नागरिकांना सोडल्यावर पाच गार्डन माटुंगा किंवा आर. ए. के. ४ रोड या निर्देशित ठिकाणी पार्किंग करतील.
मेळाव्याकरिता येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंग
१) संपुर्ण सेनापती बापट मार्ग, माहिम आणि दादर,
२) कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग
३) इंडिया बुल फायनांग्स सेंटर पीपीएल पार्किंग एलफिन्स्टन
४) कोहिनुर पीपीएल पार्किंग शिवाजी पार्क,
५) आप्पासाहेब मराठे मार्ग,
६) पाच गार्डन, माटुंगा,
७) रेती बंदर, माहिम,
८) आर ए के ४ रोड.