Mumbai Traffic Rules : मुंबईच्या या वाहतूकी मार्गात बदल करण्यात आला आहे
•प्रज्ञा जेडगे, पोलीस उप आयुक्त (दक्षिण), वाहतूक, कोंडी सोडवण्यासाठी दिले निर्देश
मुंबई :- जनतेस पोहचणारा धोका, अडथळा आणि गैरसोय टाळण्याकरीता आणि तसा निर्देश देण्याकरीता प्रज्ञा जेडगे, पोलीस उप आयुक्त (दक्षिण), वाहतूक, बृहन्मुंबई मोटार वाहन अधिनियम अधिकाराचा वापर करून याव्दारे आदेश देत आहे. 12 जानेवारी 2024 श्री अटलबिहारी वाजपेयी, ट्रान्सहार्बर लिंक म्हणजेच (MTHL), शिवडी नाव्हाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड (अटलसेतु) सुरु झाला असुन, इस्टर्न फ्री वे आणि अटल सेतू यांचे वरुन दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. पी.डी’मेलो रोड येथील वाहतुक जलदगतीने होण्यासाठी एस व्हि पी रोड ( वाडीबंदर जंक्शन) येथुन उजवे वळण घेवून पी डि’मेलो रोड दक्षिण वाहिनीवर जाणा-या वाहतुकीस पुढील 30 दिवसापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात निर्बंधीत करण्याची आवश्यकता वाटत आहे. Mumbai Traffic Rules
वाहतुक बंद करण्यात आलेली ठिकाणे
एस व्हि पी रोड (उत्तर वाहीनी) वरील वाहतूकीकरिता वाडिबंदर जंक्शन येथील उजवे वळण बंद करण्यात येत आहे. Mumbai Traffic Rules
वाहतुकीस पर्यायी मार्ग
वल्लभभाई पटेल रोड (एस व्हि पी रोड) उत्तरवाहिनीवरील वाहतुक वाडीबंदर जंक्शन येथुन डावे वळण घेवुन नमुद वाहने मायलेट बंदर (स्लिपरोड) येथे यु टर्न पी.डी’मेलो रोड (दक्षिण वाहीनी) मार्गस्थ होतील. एस व्हि पी रोड, उत्तर वाहीनी वरून वाडीबंदर जंक्शन येथुन उजवे वळण घेण्यास 24 तासांकरीता पुढील 30 दिवसापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात निर्बंध करण्यात येत आहे. Mumbai Traffic Rules