मुंबई : सायबर फसवणूक करणाऱ्यांना एका वर्षात सुमारे 30 हजार सिम कार्डची विक्री, 8 आरोपींना अटक
Mumbai Share Market Fraud News : बेकायदेशीररित्या UPC Code द्वारे Mobile No. Port करून ते सायबर गुन्हेगारांना Shares Investment Fraud करण्याकरिता विविध What’s App Groups साठी पुरविणा-या 08 आरोपींना अटक
मुंबई :- ऑनलाईन फसवणुकीसाठी सिम कार्ड Mumbai Online Sim Card Fraud पुरवणाऱ्या विविध सिम कार्ड कंपनीतील आठ आरोपींना मुंबईच्या सायबर विभागाने अटक केली आहे. Mumbai Cyber Crime Department आठ आरोपींने मागील एका वर्षात तब्बल 30 हजार सिम कार्ड कोणत्याही प्रकारची केवायसी न करता परदेशात विकल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपींनी संगणक साधनसामग्रीचा वापर करून फिर्यादी यांना MSFL Stock Chart 33 या व्हॉटसॲप ग्रुपमध्ये ॲड करून शेअर्स ट्रेडींग करण्यासाठी पैसे गुंतवणुक करण्याकरीता त्यांचे ब्रोकरेज कंपनीच्या Virtual पेजवर खाते तयार करून त्यात अधिकचा बनावट Virtual नफा जमा होत असल्याचे दाखवून त्यांना विविध बँक खात्यामध्ये एकुण 51 लाख 36 हजार इतकी रक्कम भरण्यास भाग पाडल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अटक आरोपींनी मागील 1 वर्षात सुमारे 30 हजार SIM Cards परदेशी नागरिक तसेच इतरांना कोणतेही KYC documents न स्वीकारता बेकायदेशीररित्या विकले आहेत ही माहिती सायबर पोलिसांच्या तपासासमोर आले आहेत.
MSII. Stock Chart 33 या WhatsApp Group मधील Mob No. चा तांत्रिक तपासाच्या आधारे 08 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Vi Company’s DSE Handloom Emporium employees
महेश महादेव कदम, (रा. दिवा, ठाणे मुंबई)
रोहित कन्हैयालाल यादव, (रा. भांडुप वेस्ट, मुंबई)
सागर पांडुरंग ठाकूर, (रा. वडाळा पूर्व, मुंबई)
राज रविनाथ आर्डे, (रा.कल्याण पूर्व, ठाणे)
Airtel DSE Employee गुलाबचंद कन्हैया जैस्वार, (रा.कांदिवली, मुंबई)
Shop Owners उस्मान अली मो हेजाबुर रहमान शेख, (रा. कुलाबा, मुंबई)
अब्बुबकर सिद्दिकी युसुफ, (रा. कुलाबा, मुंबई)
Vi कंपनीचा employee महेश चंद्रकांत पवार, (रा.घाटकोपर, मुंबई)
यांना अटक करण्यात आली आहे. पहिला चार आरोपींच्या मदतीने बेकायदेशीररित्या Airtel to Vi असे फक्त UPC Code चा वापर करून विविध राज्यातून मुंबई येथे Port केले आहेत. आरोपी गुलाबचंद जैस्वाल SIM Cards हे activate करून कमिशनसाठी आरोपी दुकान मालकाच्या दुकानांत विकले जाते.महेश चंद्रकांत पवार Team leader होता.बेकायदेशीररित्या Port करण्यात आलेले Mob Nos.संबंधित त्यास सर्व माहिती होती.
पोलीस पथक
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई शहर, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई शहर, लखमी गौतम, सह पोलीस आयुक्त, गुन्हे, शशीकुमार मीना, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे, मध्यविभाग, वरळी मुंबईचे प्रभारी पोलीस निरीक्षक मौसमी पाटील सहतपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आकांक्षा नलावडे, पोलीस हवालदार नवनाथ वेताळे, पोलीस शिपाई प्रकाश बावडेकर,जय गदगे यांनी पार पाडली आहे.