Panvel Police News : जवळपास 6 लाखाची रोख रक्कम लंपास करणार्या दोघा आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड
पनवेल संजय कदम : पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील गुजराती साडी सेलच्या दुकानात चोरी करून जवळपास 6 लाख रुपयाची रोख रक्कम लंपास करणार्या दोघा जणांना पनवेल शहर पोलिसांनी Panvel Police Station गजाआड केले आहे.
इस्माईल हजारी यांचे या ठिकाणी गुजरातीचे साडी सेलचे दुकान असून आरोपी मोहम्मद मुर्तुझा अय्युब (31) व वसीम वकील कुरेशी (24) यांनी आपसात संगनमत करून सदर साडीच्या दुकानाचे लॉक बनावट चावीने उघडून दुकानातील पेटीमध्ये ठेवलेले 5 लाख 92 हजाराची रोख रक्कम तसेच दुकानाच्या गल्ल्यामध्ये असलेले 5 हजार रुपये असा मिळून 5 लाख 97 हजार रुपये लबाडीच्या इराद्याने घरफोडी करून ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार, पो.उपनि.विनोद लभडे, पो.हवा.अविनाश गंथडे, नितीन वाघमारे, अमोल डोईफोडे, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, पो.ना.विनोद देशमुख, पो.शि.चंद्रशेखर चौधरी आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे या दोन आरोपींचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले आहे.