मुंबईठाणे
Trending

Aditya Thackeray : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मोठा गौप्यस्फोट! ‘मतदारयादीतही ‘वोट चोरी’! भाजपला फायदा होईल असे बदल’ – आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप!

Aditya Thackeray On EVM : मशीन-रीडेबल’ नाही: 45 हजार मतदारांना नाव शोधण्यासाठी करावी लागणार कसरत; निवडणूक आयोगावरही टीका!

मुंबई :- मुंबई महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीसाठी गुरुवार, 20 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली. ही यादी विधानसभा मतदारसंघनिहाय असून, ती प्रभागनिहाय विभागून प्रारूप यादीच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप यादीवर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवण्याची मुदत देण्यात आली असून, 5 डिसेंबरला अंतिम मतदारयादी जाहीर होईल. मात्र, ही यादी जाहीर होताच शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

भाजपला फायदेशीर ठरेल असे प्रभाग विभाजन

आदित्य ठाकरे यांनी सोशल माध्यमांवरून थेट आरोप केला आहे की, या प्रारूप मतदारयादीतही ‘वोट चोरी’ झाली आहे. प्रभागनिहाय यादी विभागताना भाजपला राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरतील असे हेतुपुरस्सर बदल करण्यात आले आहेत. ठाकरे यांच्या आरोपानुसार, मतदारयादी रणनीतीपूर्वक, लोकसंख्येच्या आधारे आणि मतांच्या गणितानुसार फोडण्यात आली आहे.

या ‘वोट चोरी’चे स्वरूप

मतदारांचे स्थानांतर: भाजप कमकुवत असलेल्या प्रभागांतील मतदारांचे स्थानांतरण करून त्यांना अन्य प्रभागांमध्ये दाखवण्यात आले आहे.

अव्यवस्था: काही ठिकाणी एकाच इमारतीतील मतदारांना दुसऱ्या प्रभागातच नाही, तर संपूर्ण वेगळ्या विधानसभा मतदारसंघात दाखवण्यात आले आहे.

‘मशीन-रीडेबल’ नसल्याने गोंधळ वाढला

आदित्य ठाकरे यांनी मतदारयादीच्या स्वरूपावरही तीव्र आक्षेप घेतला आहे. ही मतदारयादी संगणकीय पद्धतीने वाचू शकत नाही (नॉन-मशीन-रीडेबल). त्यामुळे 45 हजार मतदारांना यादीत आपले नाव शोधण्यासाठी पूर्ण यादी तपासावी लागणार आहे. हा प्रकार हेतुपुरस्सर गोंधळ निर्माण करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

निवडणूक आयोगावर कार्यवाहीची मागणी

मतदारयादीतील या घोळामुळे आदित्य ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ठाकरे म्हणाले की, जर हा घोळ आयोगाची ‘अकार्यक्षमता’ असेल, तर आयोगाला तत्काळ हटवायला हवे. परंतु, जर हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असेल, तर मतदारांना त्यांच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित करण्याच्या गुन्ह्यांतर्गत निवडणूक आयोगावर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, तसेच सर्व राजकीय पक्षांना आणि मतदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी या प्रारूप मतदारयादीतील अनियमितता काटेकोरपणे तपासावी आणि राज्य निवडणूक आयोगाची ही ‘वोट चोरी’ उघडकीस आणावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0