क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Road Accident : बाळकूम-साकेत मार्गावर रिक्षा चालकाला मोबाईल वापरणे महागात; अपघातात तीन अल्पवयीन मुले जखमी

Thane Latest Road Accident News : रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरील ट्रकला धडक; दोघे गंभीर जखमी, गुन्हा दाखल

ठाणे :- ठाण्यातील बाळकूम-साकेत मार्गावर एका रिक्षाचालकाला रिक्षा चालवताना मोबाईल वापरणे चांगलेच महागात पडले आहे. Thane Auto Rickshaw Accident News या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात तीन अल्पवयीन मुले जखमी झाली असून, त्यातील दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर उपचार सुरू असून, या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात Rabodi Police Station रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane Latest Crime News

कळव्यामध्ये राहणारे तक्रारदार हे बाळकूम भागात चायनीज खाद्य पदार्थांची हातगाडी चालवतात. दिवाळीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने गुरुवारी त्यांचा मुलगा आणि त्याचे दोन मित्र त्यांना मदत करण्यासाठी आले होते. गुरुवारी मध्यरात्री तक्रारदारांनी या तिन्ही मुलांना त्यांच्या एका ओळखीच्या रिक्षाचालकाला बोलावून घरी सोडण्यास सांगितले. रिक्षाचालक बाळकूम साकेत मार्गावरून जात असताना, तो एका हाताने मोबाईल वापरत होता. पोलीस मैदान परिसरात रिक्षा आल्यानंतर चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला जाऊन धडकली. धडकेमुळे दोन मुले रिक्षाबाहेर फेकली गेली आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. Thane Latest Accident News

अपघातानंतर रिक्षाचालक घटनास्थळावरून पळून गेला. जखमी तिघांनाही तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर मार लागलेल्या एका मुलाला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवावे लागले. राबोडी पोलीस या रिक्षाचालकाचा शोध घेत असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0