मुंबई

Mumbai Crime News : हॉस्पिटलात उपचार घेत असताना केली चोरी! चेंबूर पोलीसानी ‘स्विपर’ कामगाराला कर्नाटक येथून ठोकल्या बेड्या

•तांत्रिक तपासानंतर आरोपी भीमा पाटीलला कलबुर्गीमधून अटक; सोन्याच्या चेन चोरीचा गुन्हा उघड

मुंबई :- मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात चेंबूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. फिर्यादी हॉस्पिटलात उपचार घेत असताना त्यांच्या सोन्याची चेन चोरणाऱ्या स्विपर कामगाराला पोलिसांनी थेट कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथून अटक केली आहे.

20 ऑगस्ट 2025 रोजी चेंबूर येथील एका हॉस्पिटलात फिर्यादी उपचार घेत असताना, तेथे ‘स्विपर’ म्हणून काम करणाऱ्या भीमा शेखर पाटील या कामगाराने त्यांची सोन्याची चेन चोरली आणि तो फरार झाला. चेंबूर पोलीस ठाण्यात याबद्दल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी चेंबूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपी भीमा शेखर पाटील हा कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथे असल्याचे पोलिसांना समजले. चेंबूर पोलिसांनी तातडीने कलबुर्गी गाठले आणि तेथील भ्रमपूर पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीला जयदेव सरकारी हॉस्पीटल, बापुनगर येथून ताब्यात घेतले.

पोलीस उप निरीक्षक प्रविण लोकरे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने आणि पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-06, समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0